25 जून 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याने 1975-77 या काळात देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती. आज त्याला 45 वर्ष पूर्ण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती होती याबद्दलही सांगितले आहे. तसंच आणीबाणी काळात असलेल्या कठीण परिस्थितीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, "आणीबाणीच्या वेळेस लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी ज्या लोकांनी संघर्ष केला, यातना झेलल्या अशा सर्व लोकांना माझे शतशः नमन. त्या लोकांचा त्याग आणि बलिदान देश कधीही विसरु शकणार नाही. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आणीबीणी बद्दल बोलताना असे सांगितले की, "आपल्या नवी पीढीला यातून खूप काही शिकण्यासारखे आहे."
PM Narendra Modi Tweet:
आज से ठीक 45 वर्ष पहले देश पर आपातकाल थोपा गया था। उस समय भारत के लोकतंत्र की रक्षा के लिए जिन लोगों ने संघर्ष किया, यातनाएं झेलीं, उन सबको मेरा शत-शत नमन! उनका त्याग और बलिदान देश कभी नहीं भूल पाएगा। pic.twitter.com/jlQVJQVrsX
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2020
यापूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका केली होती. 45 वर्षांपूर्वी एका पार्टीने सत्तेच्या हव्यासापोटी संपूर्ण देशभरात आणीबाणी लागू केली होती. एका रात्रीत संपूर्ण देशाचे जेलमध्ये रुपांतर झाले होते. आणीबाणीमुळे गरीबांवर अत्याचार होत होते. प्रेस, कोर्ट यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले होते, असे अमित शाह म्हणाले होते.