Onam 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अमित शाह, राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी दिल्या ओणम सणाच्या शुभेच्छा, पाहा ट्विट
PM Modi, Ramnath Kovind, Amit Shah, Rahul Gandhi, Sonia Gandhi (Photo Credits: PTI)

देशभरातील अनेक दाक्षिणात्य लोकांमध्ये ओणम (Onam) हा सण साजरा केला जात आहे. दक्षिण भारतामधील केरळ (Kerala) मध्ये ओणम सणाचे फार महत्व आहे. तर शेतात धान्य उगवल्याच्या आनंदात 10 दिवस ओणमचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. विविधतेने नटलेल्या भारत देशात ओणम सणाला देखील फार महत्व आहे. ओणम सण शेतक-यांशी संबंधित असल्यामुळे हा आंतरराष्ट्रीय उत्सव बनला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल (30 ऑगस्ट) ला  मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमातून सांगितले. आज या सणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपति रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) सह अनेक दिग्गज नेत्यांनी ट्विटच्या माध्यमातून ओणम सणांच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

‘तुम्हाला सर्वांना ओणम च्या हार्दिक शुभेच्छा. हा एक अनोखा सण आहे ज्यात समरसतेचा उत्सव साजरा केला जातो. ही एक चांगली संधी आहे जेथे आपण कठोर परिश्रम घेणा-या शेतक-यांचे आभार मानू शकतो’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील सर्वांना ओणमच्या शुभेच्छा देत हा सण सांस्कृतिक वारसा जपणारा असा सण आहे असे म्हटले आहे. Onam 2019: 'ओणम' चा सण केरळ वासियांसाठी का महत्वाचा मानला जातो? जाणून घ्या

गृहमंत्री अमित शाह, (Amit Shah) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी देखील ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी

ओणम सणाची परंपरा ही जुन्या काळापासून चालत आली आहे. तर ओणम वेळी केळीच्या पानात जेवण वाढले जाते. या दिवसात केरळवासिय एकमेकांना शुभेच्छा देत सणाचा आनंद द्विगुणीत करताना दिसून येतात. ओणम सणावेळी नावस्पर्धा, नृत्य, संगीतस, महाभोज यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन ही केले जाते