Onam 2019 Special Food: भारतामधील विविधतेत असलेली एकता एक मोठं वैशिष्ट्य मानलं जातं. अनेक जाती, धर्म, पंथाचे लोक येथे एकत्र राहतात. आज भारतामध्ये 'ओणम' हा साजरा केला जात आहे. केरळ राज्यात नववर्षाची सुरूवात ओणम या सणापासून होते. त्यामुळे आज केरळी लोकं हा सण मोठ्या उत्सहाने साजरा करतात. मुंबईमध्येही काही विशिष्ट भागांमध्ये केरळी लोकांची खास वस्ती आहे. आज त्यांच्यासोबत तुम्हीदेखील ओणम या सणाचा आनंद लूटणार असाल तर मग त्यांची ओणम संध्या चुकवू नका. घरी जाऊन ओणम साजरा करणं शक्य नसेल तर मुंबईतील काही अस्सल दाक्षिणात्य हॉटेल्स तुमचा हा ओणम सेलिब्रेशनचा प्लॅन पूर्ण करू शकतात. Onam 2019: 'ओणम' चा सण केरळ वासियांसाठी का महत्वाचा मानला जातो? जाणून घ्या
दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीचं एक मोठं आकर्षण म्हणजे केळी पानावर विशिष्ट पद्धतीने वाढलेले लज्जतदार पदार्थ! ओणम विशेष जेवणाचं पान हे 24 खाद्य पदार्थांनी सजलेले असते. यामध्ये भातापासून अगदी पायसम खीर सारख्या गोडाच्या पदार्थाचा समावेश असतो. मग तुम्हांलाही ओणम विशेष जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आज मुंबईतील या काही हॉटेल्सला नक्की भेट द्या!
द टेस्ट ऑफ केरला
दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात 'द टेस्ट ऑफ केरला' हे हॉटेल आहे. येथे एरवी दाक्षिणात्य पदार्थांची चव चाखण्यासाठी गर्दी असते. पण ओणम विशेष जेवणावर ताव मारण्यासाठी आज नक्की भेट द्या. स्वस्तात मस्त जेवण ही हॉटेलची खासियत आहे. मग आज ओणमच्या दिवशी या हॉटेलला भेट द्यायला विसरू नका.
हॉटेल डिलक्स
हॉटेल डिलक्स देखील दक्षिण मुंबईमध्ये फोर्ट परिसरात आहे. मुंबई शहरातील जुन्या केरळी हॉटेल्सपैकी हे एक आहे. त्यामुळे तेथील अस्सल केरळी पदार्थांवर ताव मारायला आज ओणम दिवशी नक्की भेट द्या.
Holiday Inn मधील सप्तमी
सप्तमी हे पारंपारिक दाक्षिणात्य पदार्थांची चव चाखण्यासाठी उत्तम हॉटेल आहे. अत्याधुनिक धाटणीचं मात्र तरीही अस्सल केरळी पदार्थांची रेलचेल असणारे हे हॉटेल ओणम दिवशी खास फुललेलं असतं.
केरला हाऊस
नवी मुंबईतील केरला हाऊस हे हॉटेल अस्सल केरळी पदार्थांची चव तुम्हांला मुंबईत चाखायला देतात. ओणम दिवशी खास केळी पानांवर सालांकृत जेवण इथे उपलब्ध करून दिलं जातं.
ओणम हा दिवस केरळी बांधवांसाठी मोठा उत्साहाचा आहे. ओणमच्या दिवसात वामनाच्या मूर्तीसह महाबलीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्याचं पूजन मोठ्या उत्साहात केलं जातं.