पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्वीटरच्या माध्यमातून 'कुली नंबर 1' या वरूण धवनच्या आगामी सिनेमाच्या टीमचं कौतुक केलं आहे. या चित्रपटाच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव करताना चित्रीकरणादरम्यान राबवलेल्या प्लॅस्टीक बंदी मोहिमेचेही कौतुक केले आहे. सारा अली खान आणि वरूण धवन या जोडगोळीच्या ता सिनेमात चित्रीकरणाच्या दरम्यान कोणतीही प्लॅस्टिकची वस्तू न वापरण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या अलिखित नियमाचे पालन करत चित्रपट निर्मात्यांनी संपूर्ण प्लॅस्टिक बंदीची मोहिम राबवली आहे.
कुली नंबर 1 या सिनेमाच्या सेटवर प्लास्टिक बंदीची मोहिम राबवण्यात आली आहे. चित्रीकरणाच्या वेळेदरम्यान कोणीही प्लॅस्टिकची वस्तू वापरू नये काळजी घेण्यात आली होती. पाणी पिण्यापासून ते जेवणासाठी प्लॅस्टिकची वस्तू टाळण्यात आली होती. त्याऐवजी धातूच्या भांड्यांचा वापर करण्यात आला होता. याच्यासोबतीने सेटवर कोणत्याही स्वरूपाचा कचरा होणार नाही याचीदेखील काळजी घेण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी वरूण धवनने या 'प्लॅस्टिक बंदी' मोहिमेविषयी खास माहिती शेअर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील वरूण धवन आणि 'कुली नंबर 1' च्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' मोहिमेला मिळाली सारा अली खान-वरुण धवन यांची साथ, 'Coolie No 1' च्या सेटवर झाला मोठा बदल
नरेंद्र मोदी ट्वीट
Superb gesture by the team of #CoolieNo1! Happy to see the film world contributing towards freeing India from single use plastic. https://t.co/bPXFgHz2I4
— Narendra Modi (@narendramodi) September 12, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी 'सिंगल यूज प्लास्टिक' ही मोहीम राबविली होती. त्यावेळेस देशातील लोकप्रिय व्यक्तीमत्त्वांचा समावेश करण्यात आला होता. सेलिब्रिटींनीही पाठिंबा दर्शविला होता. 'सिंगल यूज प्लॅस्टिक' अभियानाला आमिर खान, आयुष्मान खुराना आणि करण जोहर यांच्यासह देशातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी पाठिंबा दर्शविला. आणि याचअंतर्गत 'कुली नंबर 1' चा सेट प्लास्टिक फ्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 'कुली नंबर 1' हा 1995 साली रीलीज झाला होता. आता या सिनेमाचा रिमेक करण्यात आला आहे. या सिनेमात वरूण धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहे. कुली नंबर 1' हा चित्रपट पुढील वर्षी 1 मे रोजी प्रदर्शित होईल