काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 'देशात लोकशाही राहिली नाही. असलीच तर ती केवळ कागदोपत्री आहे', असे म्हटले होते. राहुल गांधी यांच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आयुष्मान भारत जन आरोग्य योजना (AB-PMJAY) जम्मू आणि कश्मीर राज्यासाठी आजपासून (26 डिसेंबर 2020) सुरु करण्यात आली. या वेळी ते बोलत होते. या वेळी पंतप्रधानांनी काँग्रेसला लक्ष्य करत पंचायत म्हटले आणि न्यायालयाचे आदेश असतानाही पुड्डुचेरी येथे निवडणूका घेतल्या नाहीत असे म्हटले. तसेच, न्यायालयाने सांगूनही जे निवडणुका घेत नाही ते दिल्लीतील काही लोक मला लोकशाही शिकवत आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, पुडुडुचेरी येथे निवडणुका घ्याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयानेही आदेश दिले. परंतू तरीही तेथे निवडणूका घेण्यात आल्या नाहीत. तेथे जे लोक सरकार चालवत आहेत. तेच, लोक आज मला लोकशाहीवरुन धडे शिकवत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (हेही वाचा, PM Narendra Modi On PDP-BJP Alliance: जम्मू-कश्मीर राज्यात भाजप - पीडीपी युती का तुटली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कारण)
दरम्यान, या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू कश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्या पीपल डेमोक्रेटिक पार्टी (Peoples Democratic Party सोबतअसलेली भाजपची युती का तोडली याचेही कारण सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले केंद्रशातिस प्रदेश होण्यापूर्वी आम्ही (भाजप) जम्मू कश्मीर सरकारचा भाग होतो. मात्र, काही दिवसांमध्येच आम्ही सरकारमधून बाहेर पडलो. आमचा मुद्दा असा होता की पंचायत निवडणुका घ्याव्यात आणि लोकांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचे हक्क दिले जावेत. या भूमिकेतूनच आम्ही त्या सरकारमधून बाहेर पडलो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
Even after Supreme Court has directed that Panchayati and municipal elections should be conducted in Puducherry, the elections are not being conducted there. Those who keep on teaching me lessons on democracy are the ones who are running their govt there: PM Modi pic.twitter.com/Y4HxxuCcUy
— ANI (@ANI) December 26, 2020
दरम्यान, जम्मू-कश्मीरमध्ये नुकत्याच जिल्हा विकास मंडळ (डीडीसी) निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये गुपकर आघाडी बहुमताने निवडून आली. अपक्षांनीही मोठ्या प्रमाणावर संख्याबळ दाखवले. असे असले तरी भाजप हाच इथे सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या विषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी जम्मू-कश्मीरमधील जनता मोठ्या प्रमाणावर बाहेर पडली. या जनतेने निवडणुकीत मतदान केले.