Narendra Modi Convoy | (Photo Credit - Twitter)

पंजाब (Punjab) दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना रस्तेमार्गे जाताना एका फ्लायओव्हरवर जवळपास 15 ते 20 मिनिटे अडकून पडावे लागले. आंदोलकांनी त्यांचा रस्ता आडवला. त्यामुळे मोदी यांना दौरा अर्धवट सोडून परतावे लागले. केंद्रीय गृह मंत्रालयाने पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत घडलेली ही मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, घडल्या प्रकाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया ( PM Narendra Modi On CM Charanjit Singh Channi) दिली आहे. न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान यांनी बठिंडा विमानतळावर अधिकऱ्यांना म्हटले की, 'आपल्या मुख्यमंत्र्यांना आभार सांगा, की मी बठिंडा एअरपोर्टपर्यंत जीवंत परतू शकलो.'

केंद्रीय गृहमंत्रालयाने एका प्रतिक्रियेत म्हटले आहे की, पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेत मोठी गफलत झाल्याने त्यांचा ताफा परत फिरविण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रतिक्रियेत असेही म्हटले आहे की, मंत्रालयाने पंजाब सरकारने या चुकीबाबत आपली जबाबदारी निश्चित करावी. तसेच, दोशींवर कडक कारवाई करावी. ज्या वेळी ही घटना घडली तेव्हा पंतप्रधान बठिंडा येथून हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे निघाले होते. (हेही वाचा, PM Narendra Modi Convoy Stuck on Flyover: फ्लायओव्हरवर अडकले पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा यंत्रणेकडून चूक; पंजाबमधील रॅलीही रद्द)

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तत म्हटले की, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक केवळ स्थानिक पोलिसांची नाही तर केंद्रीय गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांचीही आहे. पंतप्रधान कोणत्या रस्त्याने जाणार त्या ठिकाणी सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवता येईल याबाबत केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाचा कलेक्टिव्ह निर्णय असतो. केंद्रीय सुरक्षा यंत्रणेनेला या आंदोलनाबाबत कोणतीही माहिती नव्हती? या सर्व प्रश्नांची केंद्रीय गृहमंत्रालय उच्चस्तरीय चौकशी करत आहे.