File image of Prime Minister Narendra Modi (Photo Credits: PIB)

देशात नियंत्रणात आलेली कोरोनाची (Coronavirus Situation) स्थिती आता पुन्हा हाताबाहेर जाऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायलाatib मिळत आहे. असे सुरु राहिल्यास देशात कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus 2nd Wave) येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच ही परिस्थिती आवरण्यासाठी पुढील उपाययोजना काय असावी यासंबंधी चर्चा करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. यासाठी पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वाची बैठक होणार आहे.

कोरोनाच्या सद्य परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. त्यासोबतच देशातील काही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ही संचारबंदी पुन्हा देशात करावी की नाही याबाबतही या बैठकीत चर्चा होईल. तसेच कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून देशात पुन्हा लॉकडाऊन करावा की नाही याबाबतही या बैठकीत चर्चा केली जाईल.हेदेखील वाचा- Moderna त्यांच्या COVID-19 vaccine साठी प्रत्येक डोस मागे आकारणार 1855-2755 रूपये; CEO ची माहिती

तसेच प्रत्येक राज्याच्या कोरोना बाबतीत काय खबरदारी घेतली जात आहे ते पाहिले जाईल आणि प्रत्येक राज्यातील कोरोनाची संख्या लक्षात घेता पुढची रणनीती आखली जाईल. त्याचबरोबर शाळा आणि रेल्वे सेवा सुरळीत कधी करता येईल यावर देखील चर्चा होईल. कोरोनाच्या लसीबद्दल देखील चर्चा होईल.

देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 91,39,865 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 1,33,738 इतका झाला आहे. देशात सद्य घडीला 4,43,486 रुग्णांवर उपचार सुरु आहे. देशात आतापर्यंत 85,62,641 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.