पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह मध्ये दाखल; CDS बिपीन रावत, आर्मी चीफ मनोज नरवणे देखील सोबत
PM Narendra Modi In Leh| Photo Credits: Twitter/ ANI

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  आज (3 जुलै) लेह (Lah) मध्ये दाखल झाले आहेत. भारत-चीन तणावानंतर आढावा घेण्यासाठी ते लद्दाखमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या

या सरप्राईज व्हिजिटमध्ये  CDS  बिपीन रावत (Chief of Defence Staff General Bipin Rawat) आणि आर्मी चीफ मनोज नरवणे (Army Chief MM Naravane) देखील आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपासून गलवान खोर्‍यांमध्ये चीन सैन्याकडून भारतीय सैनिकांवर हिंसक झडपीचे प्रकार समोर आले आहे.  या घटनेनंतर आज अचानक नरेंद्र मोदी लेह- लद्दाखमध्ये पोहचले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार,आज ते वास्तविक नियंत्रण रेषेच्या (LAC) सुरक्षेचा आढावा घेणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. काही वेळापूर्वीच नरेंद्र मोदी यांनी  निमू (Nimu) भागातील आर्मी, एअर फोर्स आणि  ITBP जवानांची भेट घेतली.

ANI Tweet 

दरम्यान 15 जूनला लद्दाख मध्ये गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षामध्ये कर्नल संतोष बाबू सह 20 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर मागील काही दिवसांपासून सीमाभागात तणाव आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या माहितीनुसार, आधी केवळ सीडीएस बिपिन रावत आज लेह लद्दाखच्या दौर्‍यावर जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. गुरूवारी अचानक देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा दौरा देखील रद्द करण्यात आला होता. दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या भेटी बद्दल कमालीची गुप्तता ठेवण्यात आली होती.

भारत-चीन संबंध निवळण्यासाठी मागील काही दिवसांत 3 कमांडर लेव्हलवर उच्च स्तरीय बैठका देखील झाल्या आहेत.