आज (7 एप्रिल) हा दिवस जगभरात World Health Day म्हणून साजरा केला जातो. सध्या जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू असल्याने भीतीचं वातावरण आहे. अशामध्ये जीवघेण्या आणि झपाट्याने पसरणार्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरातील तज्ञ मंडळी, संशोधक, आरोग्य क्षेत्र कामाला लागले आहे. आज या दिवसाचं औचित्य साधत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी सामना करणार्या डॉक्टर्स, नर्स सह सार्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्यांना सलाम केला आहे. सध्या मानवाचं War Vs Virus सुरू आहे, या युद्धात आरोग्ययंत्रणा आघाडीवर राहून लढा देत आहे. असं नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधत आपण एकमेकांच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करू असे देखील त्यांनी म्हटलं आहे. Happy World Health Day 2020: जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देणारे Quotes, Wishes, Messages शेअर करून प्रार्थना करा प्रियजनांच्या दीर्घायुष्याची!
दरम्यान यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधत कोरोनाशी सामना करण्यासाठी social distancing चा निश्चय अधिक दृढ करू यामुळे आपल्यासह आपल्या कुटुंबीयांचेही आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल. हा दिवस आपल्याला वैयक्तिक फीटनेस वाढवण्यासाठी प्रेरणा देणारा ठरो त्यामुळे एकूणच आपलं आरोग्य सुरक्षित राहील असेही ते म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदी यांचे ट्वीट
This #WorldHealthDay, let us also ensure we follow practices like social distancing which will protect our own lives as well as the lives of others. May this day also inspire us towards focusing on personal fitness through the year, which would help improve our overall health.
— Narendra Modi (@narendramodi) April 7, 2020
Today on #WorldHealthDay, let us not only pray for each other’s good health and well-being but also reaffirm our gratitude towards all those doctors, nurses, medical staff and healthcare workers who are bravely leading the battle against the COVID-19 menace. 🙏🏼
— Narendra Modi (@narendramodi) April 7, 2020
भारतामध्ये सध्या 4421 कोरोनाबाधित एकूण रूग्ण असून 3981 लोकांवर देशभरात उपचार सुरू आहेत. यापैकी 326 लोकं कोरोनामुक्त झाले आहेत तर 114 लोकांचा बळी गेला आहे. सध्या देशात कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.