जनरल बिपीन रावत यांना 'सीडीएस' जबाबदारीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंच्याकडून शुभेच्छा!
PM Narendra Modi | | (Photo Credits: File Photo)

भारताचे पहिले सीडीएस बिपीन रावत (Chief of Defence Staff in General Bipin Rawat) यांनी आज पदभार स्वीकारला आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी माजी लष्कर प्रमुख पहिले सीडीएस बनले आहेत. त्यांच्यावरील या नव्या जबाबदारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलाम करत शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी बिपीन रावत यांच्या पुढील कार्यकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लष्करप्रमुख म्हणून त्यांनी यापूर्वी भारताची सेवा केली आहे. आता सीडीएस या नव्या जबाबदारी बद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा अशी भावना त्यांनी यावेळेस व्यक्त केली. जनरल बिपीन रावत भारताचे पहिले सीडीएस; पहा Chief of Defense Staff या पदाची वैशिष्ट्यंं.  

दरम्यान कारगिल युद्धामध्ये हौतात्म्य आलेल्या शहिदांनादेखील यावेळेस त्यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. नरेंद्र मोदी यांनी सीडीएस या नव्या पदाची घोषणा 15 ऑगस्ट 2019 दिवशी लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये केली होती. 1999 च्या कारगिल युद्धानंतर स्थापन झालेल्या के. सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 'सीडीएस' या पदाची शिफारस केली होती.

नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा

आज सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये नॅशनल वॉर मेमोरिअल (National War Memorial)ला भेट दिली. दरम्यान यावेळेस लष्काराकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आहे. येथे त्यांनी शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले. दरम्यान यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी तिन्ही दलांमध्ये समन्वयता ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार असल्याचं सांगताना सैन्य आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि आम्ही एकमेकांपासून दूर आहोत असेही सांगितले.