UAE कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'झाएद पदका'ने होणार गौरव
Shaikh Mohammed bin Zayed & PM Naredra Modi (Photo Credits: PTI)

युएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद (Shaikh Mohammed bin Zayed) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांचा 'झाएद पदक' देऊन सन्मान केला आहे. राजा, राष्ट्रपती आणि राष्ट्रप्रमुखांना मिळणारा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. दोन्ही देशातील मैत्रीपूर्व संबंध आणि राजकीय सहयोगासाठी मोदींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

मोदींना हा पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा शेख मोहम्मद बिन जायद यांनी ट्विट करत केली. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "दोन्ही देशातील मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित आणि विकसित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली भूमिका आणि प्रयत्न या दोन्हीचेही आम्ही कौतुक करतो. त्यामुळेच त्यांना झायद पदकाने सन्मानित करण्यात येत आहे."

Shaikh Mohammed bin Zayed यांचे ट्विट:

ANI ट्विट:

भारत आणि यूएई यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे प्रस्थापित झाले. या संबंधांमुळे भारतामध्ये दहशतवादी कारवाया केल्या गेलेल्या अनेक दहशतवाद्यांना यूएईने भारतासमोर हजर केले.

यापूर्वी महाराणी एलिजाबेथ, जॉर्ज डब्ल्यू बुश, व्लादिमीर पुतिन, निकोलस सरकोजी, क्षी जिनपिंग आणि अँजेला मर्केल यांना 'झाएद पदका'नं गौरवण्यात आलं आहे.