File image of PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा 17 सप्टेंबर रोजी 70 वा वाढदिवस आहे. यानिमित्त आज पासुन भारतीय जनता पक्षाकडून आठवडाभराचे म्हणजेच 14 ते 20 सप्टेंबर पर्यंत 'सेवा सप्ताह' (Seva Saptah) चे आयोजन करण्यात आले आहे. यंंदा मोदींंचा 70 वा वाढदिवस असल्याने देशभरात विविध जिल्ह्यात स्वच्छ भारत आणी झाडे लावा असे कार्यक्रम राबवले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात 70 ठिकाणी हे कार्यक्रम घेतले जातील त्याशिवाय 70 व्हर्च्युअल रॅलीज चे सुद्धा आयोजन केले जाणार आहे. या संदर्भात आज भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P.  Nadda) यांंनी माहिती दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत भाजपकडून मास्कचे वाटप, रक्तदान शिबिरं, गरिबांमध्ये अन्न-फळांचे वाटप अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना रुजवण्यासाठी देखील कॅम्पेनचे आयोजन करण्यात येणार आहे.या सर्व सेलिब्रेशन मध्ये कुठेही कोरोनाच्या नियमांंचे उल्लंघन होणार नाही याची ही खबरदारी घेतली जाईल.

ANI ट्विट

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवशी सुद्धा पावसाळी अधिवेशनासाठी संसदेत असतील अशी शक्यता आहे. आज पासुन संसदेचे 18 दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. मागील वर्षीच्या मोदींच्या वाढदिवसाला सुद्धा अशाच प्रकारचे सेवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते.