पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुद्रा योजनेमुळे तामिळनाडूतील अरुलमोझी सर्वानन ही महिला झाली करोडपती; 234 रुपयांनी सुरु केला होता व्यवसाय
PM Narendra Modi & Arulmozhi Saravanan (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) महत्त्वाकांक्षी मुद्रा योजनेमुळे (Mudra Yojana) तामिळनाडूतील (Tamil Nadu) एक महिला चक्क करोडपती झाली आहे. तामिळनाडूतील मदुराई येथे राहणारी  (Arulmozhi Saravanan) ही महिला अल्पावधीतच करोडोंची मालकीन झाली आहे. तिने आपला व्यवसाय केवळ 234 रुपयांपासून सुरु केला होता. आता या महिलेची कंपनी वर्षाला एक करोडचा व्यवसाय करत आहे. (Pariksha Pe Charcha 2.0 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना PUBG बद्दल विचारला सवाल, मोदींनी दिले 'हे' उत्तर)

हाती आलेल्या माहितीनुसार, अरुलमोझी या महिलेने केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत लोन घेऊन आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर या योजनेअंतर्गत सरकारी ई-मार्केटप्लेसवर (GeM) 234 रुपयांची पहिली ऑर्डर घेतली. त्यानंतर तिचा व्यवसाय उत्तरोत्तर वाढत गेला आणि आता तिचे वार्षिक उत्पन्न 1 कोटी इतके आहे.

सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) हे जनतेचे पैसे बचतीचा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. व्यवसायासाठी एक साधन नसून हे एक सेवेचे माध्यम असल्याचे अरुलमोझी यांचे म्हणणे आहे. अरुलमोझीचे उदाहरण पंतप्रधान मोदींनी 2017 मध्ये 'मन की बात' मध्येही दिले होते.

पंतप्रधान मुद्रा योजनेने 13 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. केंद्र सरकारने 8 एप्रिल, 2015 ला पंतप्रधान मुद्रा योजनेला सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत लहान उद्योगांसाठी लोन उपलब्ध करुन दिले जाते. यामुळेच 'इज ऑफ डूइंग बिजनेस'मध्ये भारत 23 क्रमांक पुढे आला असून जगात 77 व्या क्रमांकावर आहे.