नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी, PF वरील व्याजदरात घट होण्याची शक्यता
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI/File)

नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी असून लवकरच कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पीएफ वरील व्याजदरात घट होण्याची शक्यता आहे. EPFO 2020 आर्थिक वर्ष 2020 साठी पीएफ डिपॉझिटवरील व्याजदर 5 बेसिस अंकांनी म्हणजेच 0.5 टक्क्यांनी कमी करत 8.50 टक्के करण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये व्याजदर 8.65 टक्के होता. नोकरदार वर्गाला पीएफ हे एक भविष्यासाठी लाभदायक असे माध्यम असून व्याजदर कमी झाल्यास त्यांच्यावर थेट परिणाम होणार आहे. येत्या 5 मार्चला होणाऱ्या सेन्ट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) च्या बैठकीत EPFO बाबचत निर्णय घेतला जाऊ शकतो.

इकोनॉमिक्स टाईम्स यांच्या रिपोर्टनुसार, लॉन्ग टर्म फिक्स डिपॉझिट बॉन्ड्स आणि गव्हर्मेंट सिक्युरिटीज मधून EPFO ची कमाई गेल्या वर्षभरात 50-80 बेसिस अंकांनी घटली आहे. अशातच EPFO ला या वर्षात व्याजदर तसेच कायम ठेवणे थोडे मुश्किल होऊ शकते. EPFO हे दोन नॉन-बँकिंग फायनान्शियल इंस्टिट्युळन मध्ये जवळजवळ 4500 कोटी रुपयांची गुंतवणूक करतात. यामध्ये दीवान हाउसिंग फायनान्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अॅन्ड फायनान्शियल सर्विसेस यांचा सहभाग आहे. या दोनमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यानंतर ते पुन्हा लगेच मिळवणे मुश्किल आहे.(EPFO कडून नोकरदार वर्गाला खबरदारीचा इशारा, पैशांबाबत येणाऱ्या खोट्या फोन, मेसेजवर विश्वास न ठेवण्याची सुचना)

EPFO यांनी 18 लाख करोड रुपयांपेक्षा अधिक पैशांची गुंतवणूक केली आहे. यामध्ये 85 टक्के डेट मार्केट मध्ये आणि 15 टक्के ETF's च्या माध्यमातून इक्विटीज मध्ये केली आहे. मार्च 2019 च्या शेवटी इक्विटीजमध्ये EPFO यांची एकूण गुंतवणूक 74,324 करोड रुपये होती.