Petrol-Diesel किंमतीबाबत मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! भारतात पेट्रोलचे दर स्थिरावले डिझेलच्या किंमतीत घट; जाणून नवी दिल्ली, मुंबईसह महत्वाची शहरातील आजचे दर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

भारतात लॉकडाऊन (Lockdown) सुरु झाल्यापासून इंधन दरवाढीत 82 दिवसांच्या ब्रेकनंतर सलग 17 दिवस पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात वाढ होत आहे. मात्र आजचा 18 वा दिवस पेट्रोल-डिझेल दराबाबत भारतासाठी दिलासादायक आहे. आजच्या नव्या दरानुसार नवी दिल्ली सोडून अन्य महत्त्वाच्या राज्यात पेट्रोलचे दर स्थिरावले असून डिझेलच्या किंमतीत घट झाली आहे. तर नवी दिल्लीत (Navi Delhi) पेट्रोलचे दर स्थिरावले असून डिझेलच्या दरात 0.48 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या दरानुसार आज दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर अनुक्रमे 79.76 प्रतिलीटर व 79.88 प्रतिलीटर इतके आहेत.

तर दुसरीकडे मुंबईत (Mumbai) पेट्रोलचे कालचे (23 जून) चे दर कायम असून डिझेलचे दर 8. 16 रुपयांनी कमी झाले आहेत. यानुसार मुंबईत पेट्रोलचे दर 86.54 प्रति लीटर असून डिझेलचे दर 78.20 प्रति लीटर इतके झाले आहे. Petrol Diesel Rate in India: भारतात सलग 17 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; पाहूयात 23 जूनचे नवे दर

पाहूयात भारतातील महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे 24 जून चे दर

शहर पेट्रोल दर डिझेल दर
मुंबई रु.   86.54 रु. 78.20
दिल्ली रु. 79.76  रु. 79.88
चेन्नई रु. 83.04 रु. 77.16
कोलकाता रु. 81.45 रु. 75.04

ऑईल कंपन्या 7 जून पासून इंधनाच्या दरात वाढ करत आहेत. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे तब्बल 82 दिवसांचा ब्रेक लागला होता. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी इंधनाच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. मार्चच्या मध्यात पेट्रोल-डिझेलचे दर अखेरचे वाढले होते. त्यानंतर ते 6 जून पर्यंत स्थिर होते.

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी वाढलेली एक्साईज ड्युटी ग्राहकांवर लादली नाही. वाढलेली एक्साईज ड्युटी आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेल्या इंधनाच्या किंमतीसह अॅडजेस्ट करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती बदलत आहेत आणि तेल कंपन्या बदलत्या किंमतीनुसार आपले दर अॅडजेस्ट करत आहे.