भारतात सलग 17 व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमतीत वाढ कायम आहे. एककीकडे देश कोरोना व्हायरससारख्या (Coronavirus) संकटाने पिळवटून गेला असता दुसरीकडे दिवसेंदिवस होत चाललेली इंधन दरवाढ ही सर्वसामान्यांचे कंबरडं मोडणारी आहे. आजच्या (23 जून) च्या नव्या दरानुसार, नवी दिल्लीत (Navi Delhi) पेट्रोल 0.20 पैशांनी महागले असून, डिझेल 0.55 पैशांनी महागले आहे. त्यानुसार नवी दिल्लीत पेट्रोल 79.76 प्रति लीटर तर डिझेल 79.40 पैशांनी महागले आहे. नवी दिल्लीत भारतातील महत्त्वाच्या शहरातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत.
मुंबईत (Mumbai) पेट्रोल 0.18 पैशांनी महागले असून डिझेल 9.12 पैशांनी महागले आहे. नवीन दरानुसार मुंबईत पेट्रोल 86.54 प्रति लीटर तर डिझेल 86.36 प्रति लीटर इतके झाले आहे.
हेदेखील वाचा- Petrol Diesel Rate in India: भारतात पेट्रोल-डिझेल भाववाढ कायम, पाहूया 22 जूनचे दर
पाहूयात भारतातील महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे 23 जून चे दर
शहर | पेट्रोल दर | डिझेल दर |
मुंबई | रु. 86.54 | रु. 86.36 |
दिल्ली | रु. 79.76 | रु. 79.40 |
चेन्नई | रु. 83.04 | रु. 82.87 |
कोलकाता | रु. 81.45 | रु. 81.27 |
लॉकडाऊनमुळे तब्बल 82 दिवसांचा ब्रेक लागला होता. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी इंधनाच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. मार्चच्या मध्यात पेट्रोल-डिझेलचे दर अखेरचे वाढले होते. त्यानंतर ते 6 जून पर्यंत स्थिर होते. त्यानंतर 7 जून पासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक दिवशी बदलण्याचा निर्णय घेतला आहे.