Representational Image | File Image | (Photo Credits: Getty Images)

Fuel Price in India: आठवड्याची सुरुवात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याच्या बातमीने होत आहे. मागील 2 दिवसांपासून स्थिरावले पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Rate) आज वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आजच्या दरानुसार, नवी दिल्लीत (New Delhi) पेट्रोलचा दर 91.53 रुपये प्रति लीटर इतका असून डिझेलचा दर 82.06 रुपये प्रति लीटर इतका आहे. मागील हा आठवड्यात दिल्लीत पेट्रोलचा दर 90.55 रुपये प्रति लीटर इतका होता. याचाच अर्थ 0.98 पैसे इतकी वाढ झाली आहे. तर मुंबईत (Mumbai) आजचा पेट्रोल दर 97.86 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 89.17 रुपये प्रति लीटर इतका आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुका संपताच हळूहळू पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसली. यापूर्वी 66 दिवसांपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली नव्हती. मात्र निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर बहुतांश वेळा इंधनाच्या किंमती हलक्या स्वरुपात खाली आणल्या होत्या. तर गेल्या 16 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलमध्ये कोणताच बदल केला नव्हता. अखेर 15 एप्रिलला पेट्रोल 16 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 14 पैसे प्रति लीटर स्वस्त झाले होते. त्यानंतर किंमती सातत्याने स्थिर होत्या.हेदेखील वाचा- Bank Holidays in May 2021: मे महिन्यात 'या' तारखांच्या दिवशी बँकांना राहणार सुट्टी; संपूर्ण यादी जाणून घ्या

जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

शहर पेट्रोल (प्रति लीटर रुपये)  डिझेल (प्रति लीटर रुपये)
मुंबई 97.86 89.17
नवी दिल्ली 91.53 82.06
चेन्नई 93.38 86.96
बंगळूरू 94.57 86.99
पाटणा 94.11 87.59
चंदिगड़ 88.05 81.73
कोलकाता 91.66 84.9

देशातील सर्व राज्यांमध्ये विकलेल्या जाणाऱ्या इंधनाचे दर थोड्या अधिक प्रमाणात अशाच प्रकारे वाढतात. ज्याचा थेट बोजा हा सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडतो. ज्यामुळे महागाई वाढते आणि सर्वसामान्यांचा त्रासही.

देशातील तीन तेल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC कडून रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले जातात. नव्या दरांसाठी तुम्ही या कंपन्यांच्या वेबसाइट्सला भेट देऊ शकता. या व्यतिरिक्त फोनवरुन SMS च्या माध्यमातून सुद्धा दर तपासून पाहू शकता. तर 92249 92249 या क्रमांकावर SMS पाठवून पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही जाणून घेऊ शकता.