भारतामध्ये आज (22 मार्च) पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) किंमतींमध्ये 4 महिन्यांनंतर दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आज प्रतिलीटर 80 पैशांनी वाढवण्यात आले आहेत. भारताची राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये पेट्रोल प्रतिलीटर 96.21 रूपये आहे तर डिझेल 87.47 रूपये आहे. तर आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये इंधन दर (Fuel Rates) हे ₹110.82 प्रतिलीटर पेट्रोल आणि 95 रूपये प्रतिलीटर डिझेल आहे.
जागतिक स्तरावर युक्रेन-रशिया संघर्षाच्या परिस्थितीमध्ये तेलाच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. त्याचा फटका देखील भारताला बसला आहे. वाढते इंधन दर, भारतीय रूपयामध्ये होत असलेली घसरण यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किंमतींचा भडका उडाला आहे. हे देखील नक्की वाचा: Cooking Gas Price Hike: घरगुती गॅस सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये 50 रूपयांची वाढ; 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी मोजावे लागणार Rs 949.50 - सूत्रांची माहिती .
भारतातील प्रमुख शहरामधील इंधन दर
- मुंबई
पेट्रोल - Rs 110.82
डिझेल - Rs 95.00
- दिल्ली
पेट्रोल -Rs 96.21
डिझेल - Rs 87.47
- चैन्नई
पेट्रोल - Rs 102.16
डिझेल - Rs 92.19
- कोलकाता
पेट्रोल - Rs 105.51
डिझेल - Rs 90.62
जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचा दर काय?
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि ग्राहक आहे. आपल्या तेलाच्या गरजेपैकी 85% तेल आपण परदेशी बाजारपेठांमधून विकत घेतो. दरम्यान आपल्या स्थानिक डिझेल आणि पेट्रोलच्या किमती या दोन इंधनांच्या आंतरराष्ट्रीय किमतींशी निगडीत आहेत त्यामुळे क्रुड ऑईल मध्ये वाढ झाल्यास देशात इंधनदर वाढतात.