भारतामध्ये आज (20 ऑक्टोबर) इंधनाचे दर (Fuel Rates) पुन्हा एकदा नव्या उच्चांकांवर पोहचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलच्या किंमतींमध्ये (Crude Oil Price) वाढ झाल्याने आता देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे ( Diesel )देखील दर वाढले आहेत. भारताची राजधानी दिल्लीत (Delhi) आज पेट्रोल, डिझेल मध्ये 35 पैशांची वाढ झाली असून ते प्रतिलीटर ₹ 106.19 आणि ₹ 94.92 पर्यंत पोहचले आहे. तर मुंबई (Mumbai) मध्ये पेट्रोल ₹ 112.11 आणि डिझेल ₹ 102.89 पर्यंत पोहचले आहे. देशात चार महत्त्वाच्या मेट्रो सिटीजपैकी मुंबई मध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. दरम्यान देशामध्ये प्रत्येक राज्यागणिक VAT हा वेगवेगळा असल्याने इंधनाच्या दरात फरक पहायला मिळत आहे. नक्की वाचा: Petrol Diesel Price and Taxes: पेट्रोल, डिझेलवर कसा लागतो कर आणि वाढते इंधनाची किंमत? घ्या जाणून.
महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्ली- 106.19 (पेट्रोल प्रतिलीटर), 94.92 (डिझेल प्रतिलीटर)
मुंबई- 112.11 (पेट्रोल प्रतिलीटर), 102.89 (डिझेल प्रतिलीटर)
चैन्नई- 103.31 (पेट्रोल प्रतिलीटर), 99.26 (डिझेल प्रतिलीटर)
कोलकाता- 106.78 (पेट्रोल प्रतिलीटर), 98.03 (डिझेल प्रतिलीटर)
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियन यांच्याकडून रोज सकाळी 6 वाजता देशातील पेट्रोल, डिझेलच दर जाहीर केलेल जातात. दरम्यान भारतामधील इंधन दर हा आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रुड ऑईलच्या किंमती आणि रूपया व डॉलरच्या एक्सचेंज रेट वर अवलंबून असतो.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊर्जा पुरवठ्याची समस्या कायम राहिली. ब्रेंट क्रूड 75 सेंट वाढून 85.08 डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) वायदा 52 सेंट वाढून $ 82.96 वर स्थिरावला आहे.
एअरलाइन्सला एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ किंवा जेट इंधन) ज्या किंमतीला विकले जाते त्यापेक्षा पेट्रोल आता 34 टक्के अधिक महाग आहे. दिल्लीत ATF ची किंमत, 79,020.16 प्रति किलो लिटर किंवा अंदाजे ₹ 79 प्रति लिटर आहे.