पेट्रोल डिझेल दरवाढ कायम; पाहा काय आहेत आजचे दर
Representational Image | File Image | (Photo Credits: Getty Images)

गेल्या आठवड्याभरापासून पेट्रोल, डिझेलच्या दरात होणारी वाढ कायम आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात 0.17 पैशांनी वाढ झाल्याने पेट्रोलची किंमत 70.72 रुपये लीटर झाली आहे. डिझेलच्या दरात 0.19 पैशांनी वाढ झाल्याने 65.16 रूपये लीटरने डिझेलची विक्री होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. कच्च्या तेलातील किंमतीत झालेल्या वाढीमुळे इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे.

दिल्लीत पेट्रोलची किंमत 70.95 रूपये प्रति लीटर तर डिझेल 70.95 रूपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 0.23 पैशांनी वाढ झाली असून पेट्रोलची किंमत 76.58 रुपये प्रति लीटर झाली आहे. डिझेलच्या किंमतीत 0.31 पैशांनी वाढ झाल्याने डिझेल 68.53 रूपये लीटरने उपलब्ध होत आहे.