
Petrol-Diesel Price Today: तेल इंधन कंपन्यांकडून आजचे दर जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे नागरिकांना आज थोडासा दिलासा मिळणार आहे. तर आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे स्वदेशीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिरावल्या आहेत. मात्र शनिवारी पेट्रोल 30 पैसे प्रति लीटरने महागले होते. पण डिझेलचे दर स्थिर होते. तर जाणून घ्या मुंबई, दिल्ली, कोलकाता, चैन्नईसह तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबद्दल.
तर सातत्याने इंधन दर वाढ होत असल्याने सामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. देशात अन्य राज्यांच्या तुलनेत मध्य प्रदेशात पेट्रोलचे दर उच्चस्तरावर पोहचले आहेत. सागरमध्ये पेट्रोल 109.56 रुपये तर डिझेल 98.35 रुपये प्रति लीटर झाले आहे. तसेच मध्य प्रदेशातील बालाघाट येथे पेट्रोलचे दर 112.41 रुपये प्रति लीटर झाले आहे.(Aadhaar-PF Account Linking: आधार कार्ड पीएफ अकाऊंटशी UMANG App, EPFO Portal आणि ऑफलाईन पद्धतीने कसे लिंक कराल? जाणून घ्या)
>दिल्ली
-पेट्रोल 101.84 रुपये, डिझेल 89.87 रुपये
>मुंबई
-पेट्रोल 107.83 रुपये, डिझेल 97.45 रुपये
>चैन्नई
-पेट्रोल 102.49 रुपये, डिझेल 94.39 रुपये
>कोलकाता
-पेट्रोल 102.08 रुपये, डिझेल 93.02 रुपये
>बंगळुरु
-पेट्रोल 105.25 रुपये, डिझेल 95.26 रुपये
आजच्या इंधन दराबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही SMS च्या माध्यमातून पाहू शकता. त्याचसोबत HPCL ग्राहकांना HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस पाठवून सुद्धा इंधनाचे दर माहिती करुन घेऊ शकता.
दरम्यान, विदेशी चलनासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑइलच्या किंमतीच्या आधारावर पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रतिदिन अपडेट केल्या जातात. ऑइल मार्केटिंग कंपन्या किंमतीबद्दल आढावा घेतात आणि त्यानंतर रोज पेट्रोल-डिझेलच्या किंमती ठरवतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम तेल कंपन्या प्रतिदिन सकाळी विविध शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करतात.