Petrol, Diesel Price Today: इंधनदरात आज पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचा पेट्रोल, डिझेलचा दर
Fuel Price Hike India | (File Image)

भारतामध्ये पुन्हा पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) किंमतींमध्ये उच्चांकी वाढ झाली आहे. सध्या देशात इंधन दरामध्ये (Fuel Rates) 35 पैशांनी वाढ झाली आहे. आजच्या इंधंदरांनुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचे उच्चांकी दर 105.49 प्रतिलीटर तर मुंबई मध्ये 111.43 रूपये प्रतिलीटर असा दर नोंदवण्यात आला आहे. तर डिझेलचे दर मुंबई मध्ये 102.15 आणि दिल्लीत 94.22 रूपये इतका आहे. आज सलग तिसर्‍या दिवशी इंधनदर आणि डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. 12 आणि 13 ऑक्टोबर दिवशी इंधनदरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

भारतामध्ये इंडियन ऑईल(Indian Oil),भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (Hindustan Petroleum)कडून दर ठरवताना ते आंतरराष्ट्रीय बाजारातील 15 दिवस पूर्वीच्या किंमती, फॉरेन स्टॉक एक्सचेंज यांवर अवलंबून असतात. Petrol Diesel Price and Taxes: पेट्रोल, डिझेलवर कसा लागतो कर आणि वाढते इंधनाची किंमत? घ्या जाणून.

भारतातील प्रमुख शहरातील आजचे इंधनदर

  • दिल्ली- पेट्रोल (प्रतिलीटर)  Rs 105.49, डिझेल (प्रतिलीटर)Rs 94.22
  • मुंबई- पेट्रोल (प्रतिलीटर)  Rs 111.43, डिझेल (प्रतिलीटर)Rs 102.15
  • कोलकाता- पेट्रोल (प्रतिलीटर)  Rs 106.10, डिझेल (प्रतिलीटर) Rs 97.33
  • चैन्नई- पेट्रोल (प्रतिलीटर)  Rs 102.70, डिझेल (प्रतिलीटर)Rs 98.59
  • बेंगलूरू- पेट्रोल (प्रतिलीटर)  Rs 109.16, डिझेल (प्रतिलीटर) Rs 100.00
  • हैदराबाद- पेट्रोल (प्रतिलीटर)  Rs 109.73, डिझेल (प्रतिलीटर) Rs 102.80

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

दररोज सकाळी 6 वाजता भारतामध्ये इंधनपुरवठा करणार्‍या कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले जातात. त्यानुसार प्रत्येक राज्यामध्ये कर प्रणाली पाहता पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात. भारतामध्ये राज्यागणिक पेट्रोल,डिझेलचे दर वेगवेगळे असतात. वॅटचा दर प्रत्येक ठिकाणी वेगळा असल्याने इंढन दर वेगळे असतात. देशात सर्वाधिक व्हॅट राजस्थान त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आहे.