Petrol Diesel Price Today: सलग दुसर्‍या दिवशी इंधनदरात वाढ; पहा मुंबई सह देशातील महत्त्वाच्या शहरातील नव्या पेट्रोल, डिझेलच्या किंमती
Photo Credit - PTI

पेट्रोल, डिझेलच्या किंमती आज (8 जुलै) देशामध्ये पुन्हा वाढल्या आहेत. दिल्लीमध्येही काल पेट्रोलच्या किंमती शंभरीच्या पार गेल्या आहेत. आजची इंधनदरातील वाढ ही जुलै महिन्यातील सहावी वाढ आहे. जून आणि मे महिन्यात पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये प्रत्येकी 16 वेळेस ऑईल रिटेलर्स कडून दर वाढवण्यात आले आहेत. आज देशात पेट्रोलच्या दरात 35 पैसे तर डिझेलच्या दरात 9 पैसे वाढ नोंदवण्यात आली आहे.

सध्या दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू कश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, सिक्कीम आणि लद्दाख मध्येही पेट्रोलच्या दराने 100 री पार केली आहे.

पहा मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरातील इंधन दर काय आहेत?

दिल्ली - पेट्रोल: 100.56 रुपये, डिझेल : 89.62 . रुपये

मुंबई - पेट्रोल: 106.59 रुपये, डिझेल : 97.18 रुपये

कोलकाता - पेट्रोल: 100.62 रुपये, डिझेल : 92.65 रुपये

चेन्नई - पेट्रोल: 101.37 रुपये, डिझेल की कीमत: 94.15 रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

भारतामध्ये 3 ऑईल मार्केटिंग कंपन्या आहेत. यामध्ये HPCL, BPCL आणि IOC यांचा समावेश आहे. नियमित सकाळी 6 वाजता पेट्रोल, डिझेलचे दर त्यांच्याकडून जाहीर केले जातात. त्यांच्या दरांची यादी नियमित वेबसाईट वर देखील प्रसिद्ध केली जाते. सोबत्च मोबाईल वर देखील एसएमएस अलर्ट्स द्वारा देखील ती सांगितली जाते. पेट्रोल, डिझेलच्या दरावर एक्साईज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टींचा प्रभाव होत असतो त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर असतात. अनेकदा हे दर दुप्पट होतात.