Petrol-Diesel Price Today: तेलाच्या किंमती दिवसागणित तुफान वाढत चालल्याचे दिसून येत आहे. खाद्य-पदार्थांपासून ते पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. अशातच आज तेल कंपन्यांनी सातत्याने सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. याचा परिणामी फटका नागरिकांच्या शिखाला बसत आहे.(Air India घरवापसी नंतर Ratan Tata यांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले 'Welcome Back')
आज डिझेलच्या दरात प्रति लीटर 35 पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोल 30 पैसे प्रति लीटरने महागले आहे. तर दिल्लीत इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल 104.44 रुपये लीटरने विक्री केले जात आहे. डिझेल 92.82 रुपये प्रति लीटर आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्य नागरिकांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचसोबत मुंबईत डिझेलच्या दराने रेकॉर्ड ब्रेक केला असून आज त्याचे दर 100.66 रुपये प्रति लीटर झाला आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती.(IMPS द्वारा आता व्यवहाराची मर्यादा 2 लाखावरून 5 लाख; RBI ची माहिती)
>>दिल्ली
पेट्रोल- 104.1, डिझेल- 92.82
>>मुंबई
पेट्रोल- 110.12, डिझेल- 100.66
>>कोलकाता
पेट्रोल-104.80, डिझेल- 95.93
>>चेन्नई
पेट्रोल-101.53, डिझेल- 97.26
दरम्यान, विदेशी चलानाच्या दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति दिनी अपडेट केल्या जातात. तेल मार्केटिंग कंपन्या किंमतीच्या समीक्षेनंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम तेल कंपन्या प्रति दिन विविध शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करतात.