online ((Photo Credits: Pexels)

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank of India)कडून आता IMPS transactions चे लिमिट 2 लाखावरून 5 लाख करण्यात आले आहे. देशान्तर्गत निधी हस्तान्तरण ताबडतोब व 24X7 करून देणाऱ्या IMPS सुविधेचे महत्त्व लक्षात घेऊन, ग्राहकांच्या सोयीसाठी हा बदल केला आहे. असे आरबीआय कडून आज सांगण्यात आले आहे.

दरम्यान National Payments Corporation of India ची IMPS ही सेवा 24 तास तत्काळ भरणा सेवेसाठी आहे. इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग, बॅंक ब्रांच, एटीएम,एसएमएस आणि IVRS वरून यामध्ये व्यवहार करण्याचा पर्याय आहे. पूर्वी त्यासाठी 2 लाखाची मर्यादा होती. पण आता ती वाढवून 5 लाख करण्यात आली आहे. या व्यवहारासाठी कोणताही अतिरिक्त शुल्क द्यावा लागत नाही. देशात आरटीजीएस ची देखील सेवा 24 तास खुली आहे.

PIB Tweet

आरबीआय ने डेली ट्रान्झॅक्शन ची जी सीमा वाढवण्यात आली आहे ती SMS आणि IVRS साठी लागू असणार नाही. SMS आणि IVRS साठी फेवळ 5000 रूपये ट्रान्सफर करता येणार आहे. 1 ऑगस्ट पासून SBI ची IMPS सुविधा होणार मोफत, घर-गाडी खरेदी करणे सुद्धा होणार स्वस्त.

आज आरबीआय चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण देखील जाहीर केले आहे. यामध्ये रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट मध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. मॉनेटरी पॉलिसी कमिटीने आर्थिक वर्ष 2021 साठी जीडीपी वाढीचा दर 9.5% वर कायम ठेवला आहे.