Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. काही राज्यात याचे दर शंभरीच्या पार गेले आहेत. अशातच आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जाहीर करत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 35-35 पैशांनी वाढ केली आहे. तर IOCL च्या नुसार, 15 ऑक्टोंबरला राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.14 रुपये प्रति लीटर तर डिझेल 93.87 रुपये प्रति लीटर झाले आहे.
तर मुंबईत पेट्रोल 111.09 रुपये प्रति लीटर तर डिझेल 101.78 रुपये प्रति लीटरने विक्री केले जात आहे. तर देशातील बहुतांश ठिकाणी पेट्रोलच्या किंमती आधीपासूनच शंभरीच्या पार गेल्या आहेत. तसेच डिझेलचे दर ही आता वाढत असल्याने त्याचा वाहन चालकांना फटका बसत आहे. तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधन दर.(SBI Mega e-auction: देशभरातील मालमत्तांचा एसबीआयकडून ई-लिलाव; सहभागी होण्यासाठी फॉलो करा 'या' स्टेप्स)
दिल्ली
पेट्रोल- 105य14 रुपये प्रति लीटर, डिझेल- 93.87 रुपये प्रति लीटर
मुंबई
पेट्रोल- 111.09 रुपये प्रति लीटर, डिझेल-101.78 रुपये प्रति लीटर
कोलकाता
पेट्रोल-105.76 रुपये प्रति लीटर, डिझेल-96.98 रुपये प्रति लीटर
चेन्नई
पेट्रोल-102.40 रुपये प्रति लीटर, डिझेल-98.26 रुपये प्रति लीटर
दरम्यान, विदेशी चलानाच्या दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति दिनी अपडेट केल्या जातात. तेल मार्केटिंग कंपन्या किंमतीच्या समीक्षेनंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम तेल कंपन्या प्रति दिन विविध शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करतात.