भारतामध्ये आज आठवड्याच्या सुरूवातीला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्यात आल्या आहे. ऑईल मार्केटिंग कंपनीकडून (Oil Marketing Companies) आज सलग दुसर्या दिवशी देशात इंधनाच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. यंदाच्या विकेंडला पेट्रोलच्या (Petrol Price) किंमती वाढल्या होत्या तर डिझेलच्या किंमती ( Diesel Price) तुलनेत स्थिर होत्या. भारतामध्ये मुंबई (Mumbai) शहरात पेट्रोल सर्वाधिक महाग आहे. पेट्रोलसाठी मुंबईकर प्रतिलीटर Rs 107.83 मोजत आहेत तर डिझेलसाठी Rs 97.45 मोजावे लागत आहेत. देशात प्रत्येक राज्यागणिक व्हॅट वेगवेगळा असल्याने प्रत्येक राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वेगवेगळ्या आहेत.
जाणून घ्या मुंबई सह देशातील अन्य मेट्रो सिटी मधील इंधनदर
- दिल्ली - पेट्रोल: 101.84 रुपये, डिझेल : 89.87 रुपये
- मुंबई - पेट्रोल: 107.83 रुपये, डिझेल : 97.45 रुपये
- कोलकाता - पेट्रोल: 102.08 रुपये, डिझेल : 93.02 रुपये
- चेन्नई - पेट्रोल: 102.49 रुपये, डिझेल : 94.39 रुपये
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
नियमित सकाळी 6 वाजता पेट्रोल, डिझेलचे दर त्यांच्याकडून जाहीर केले जातात. त्यांच्या दरांची यादी नियमित वेबसाईट वर देखील प्रसिद्ध केली जाते. सोबतच मोबाईल वर देखील एसएमएस अलर्ट्स द्वारा देखील ती सांगितली जाते. पेट्रोल, डिझेलच्या दरावर एक्साईज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टींचा प्रभाव होत असतो त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर असतात. अनेकदा हे दर दुप्पट होतात. इंडियन ऑयल चे ग्राहक मोबाइल मधून RSP सोबत शहराचा कोड टाकून 9224992249 वर मेसेज पाठवू शकतात. BPCLचे ग्राहक RSP टाइप करून 9223112222 वर SMS पाठवू शकतात. HPCL चे ग्राहक HP Price लिहून 9222201122 वर SMS पाठवून दर पाहू शकतात.