Petrol and Diesel Prices On July 13: भारतामध्ये आज इंधनदर स्थिर; पहा मुंबईसह महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल, डिझेल दर
Photo Credit - PTI

भारतामध्ये आज (13 जुलै) ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. काल देशात ऑईल कंपन्यांकडून पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ तर डिझेलच्या दरांमध्ये कपात करण्यात आली होती. सध्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलने दरांमध्ये शंभरीचा आकडा पार केला आहे तर डिझेल देखील आता शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुंबई शहरामध्ये 29 मे दिवशीच पेट्रोलने शंभरी ओलांडली होती. त्यानंतर सातत्याने या दरात वाढ होत असल्याने अद्याप पेट्रोलचे दर शंभरी खाली आलेले नाहीत. तर डिझेलदेखील आता अगदी शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. काल मुंबईत पेट्रोलचा दर 27 पैशांनी वाढून 107.20 रूपये प्रति लीटर झाला आहे आणि डिझेल 17 पैशांनी कमी झाल्याने 97.29 रूपये प्रति लीटर झाले आहे.

मुंबईप्रमाणेच दिल्लीतही तशीच परिस्थिती आहे. दिल्लीमध्ये काल पेट्रोल 28 पैशांनी वाढलं तर डिझेल 16 पैशांनी कमी झालं त्यामुळे आजचे तेथील पेट्रोलचे दर 101.19 प्रति लीटर आणि डिझेल 89.72 प्रति लीटर इतके आहे.

जाणून घ्या मुंबई, दिल्ली सह देशातील प्रमुख शहरातील इंधन दर

दिल्ली - पेट्रोल: 101.19 रुपये, डिझेल :  89.72  रुपये

मुंबई - पेट्रोल:  107.20 रुपये, डिझेल : 97.29  रुपये

कोलकाता - पेट्रोल: 101.35 रुपये, डिझेल : 92.81 रुपये

चेन्नई - पेट्रोल: 101.92 रुपये, डिझेल : 94.24 रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

भारतामध्ये 3 ऑईल मार्केटिंग कंपन्या आहेत. यामध्ये HPCL, BPCL आणि IOC यांचा समावेश आहे. नियमित सकाळी 6 वाजता पेट्रोल, डिझेलचे दर त्यांच्याकडून जाहीर केले जातात. त्यांच्या दरांची यादी नियमित वेबसाईट वर देखील प्रसिद्ध केली जाते. सोबत्च मोबाईल वर देखील एसएमएस अलर्ट्स द्वारा देखील ती सांगितली जाते. पेट्रोल, डिझेलच्या दरावर एक्साईज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टींचा प्रभाव होत असतो त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर असतात. अनेकदा हे दर दुप्पट होतात.