Petrol and Diesel Prices in India | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol and Diesel Prices) सलग दुसर्‍या दिवशी वाढ झाली आहे. काल 4 मे दिवशी देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मध्ये 18 दिवसांनंतर वाढ करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने आता राज्या-राज्यातील फ्युअल रिटेलर्सकडूनही पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आजच्या इंधनदरानुसार मुंबई (Mumbai)  मध्ये पेट्रोलचे दर 97.12 रूपये प्रति लीटर आहे तर डिझेलचे दर 88.19 रूपये प्रति लीटर आहे.

दरम्यान मुंबई प्रमाणेच देशातील इतर मेट्रो सीटी मध्ये देखील आज पेट्रोल-डीझेलचे दर चढल्याचं पहायला मिळालं आहे. दिल्ली मध्ये पेट्रोलचे दर 90.74रुपये प्रतिलीटर आहे तर डीझेलचे दर 81.12 रूपये आहेत. चैन्नई मध्ये पेट्रोल आज 92.70 तर डिझेल 86.09 रूपये ला उपलब्ध आहे. कोलकाता मध्ये पेट्रोलचे आजचे दर 90.92 रूपये प्रति लीटर आहे तर डीझेलचे दर 83.98 रूपये प्रति लीटर आहे. (Petrol-Diesel Price Hike Today: निवडणूका संपल्यानंतर वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाच्या किंमती).

देशात दररोज सकाळी इंधनाचे दर जारी केले जातात. इंडीयन ऑईल कॉरपरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉरपरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रिलियम कॉरपरेशन लिमिटेड हे इनपूट कॉस्ट वर दररोज सकाळी इंधनाचे दर जाहीर करत असतात. 4 मे म्हणजे कालच 18 दिवसांनंतर भारतात पेट्रोलचे दर 15 पैसे तर डिझेलचे दर 18 पैशांनी वधारले होते.

भारतामध्ये सध्या कोविड 19 ची दुसरी लाट असली तरीही वाहतूक ठप्प नाही. देशामध्ये वाहतूक सेवा सुरू ठेवण्यात आल्याने सध्या इंधनासाठी मागणी आहे. 27 एप्रिल पासून जागतिक पातळीवर इंधनाचे दर अपट्रेंड आहेत.