दिल्ली: ऑस्कर 2019 मध्ये 'Period End of Sentence'च्या यशानंतर मुख्य नायिका स्नेहाच्या गावामध्ये सेलिब्रेशन
Period End of Sentence (Photo Credits: Twitter)

अमेरिकेमध्ये आज ऑस्कर 2019 (Oscars 2019)  चा रंगारंग कार्यक्रम पार पडला. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये 'मासिकपाळी' आणि भारतीय समाजामध्ये आज 21 व्या दशकामध्येही या विषयाबद्दल खुलेपणाने बोलले जात नाही या विषयावर आधारित 'Period End of Sentence' या लघूपटाने ऑस्करचा यंदाचा Best Documentary Short Subject हा पुरस्कार मिळवला. ऑस्करमध्ये बॉलिवूडचा किंवा भारतीय सिनेमा अजून बाजी मारू शकला नसला तरीही यंदा 'Period. End of Sentence' लघूपटामुळे आनंदाचं वातावरण आहे. दिल्लीच्या हपूर गावातील ही कथा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचल्याने त्या गावामध्येही सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. Oscars Award 2019: भारतीय निर्माती Guneet Monga च्या 'Period End of Sentence' ने ऑस्कर पटकावला; सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्ररी म्हणून गौरव

दिल्लीमध्ये सेलिब्रेशन

स्नेहा ही 'Period End of Sentence' लघूपटाची मुख्य नायिका आहे. ऑस्कर 2019 ची घोषणा झाल्यानंतर स्नेहाच्या कुटुंबीयांनी दिल्लीमध्ये मिठाई वाटप करून सेलिब्रेशन केले. दिल्लीजवळ काथिखेरा (Kathikhera) गावातील महिलांनी या लघूपटामध्ये काम केले आहे. स्नेहा या गावामध्ये गावकरी महिल्यांच्या मदतीने सॅनिटरी पॅड्स बनवण्याचा कारखाना चालवते. सध्या स्नेहा तिच्या साथीदार्‍यांसोबत अमेरिकेला ऑस्कर 2019च्या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पोहचली आहे.