देशात दिवसेंदिवस वाहतुकीचे नियम कठोर होत असताना त्यावर बसणारा भुर्दंडही आता खिशाला न परवडणारा असा झाला आहे. त्यातच आता नवीन 'मोटार वाहतूक कायद्या' (Motor Vehicle Act) नुसार, आता चप्पल (Slipper) किंवा सँडल (Sandals) घालून दुचाकी चालविणा-यांसही भुर्दंड भरावा लागणार आहे. नवभारत टाईम्स ने दिलेल्या वृत्तानुसार, असे केल्यास संबंधित वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले असे ग्राह्य धरले जाईल. वाहतुकीच्या या नवीन नियमांमुळे न केवळ खिशाला चाप बसणार आहे तर असे करणा-या वाहनचालकास जेलची हवा खावी लागणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरीही हे नियम लवकरच लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येतय.
वाहतूक अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, चप्पल किंवा सँडल घालून दुचाकी चालविल्यास दंड आकारणे हा नियम खूप जुना आहे. मात्र हा नियम पुर्णपणे अंमलात आला नव्हता. मात्र आता असे करणा-यास जबरदस्त भुर्दंड बसणार असून त्याची सुरुवातही झाली आहे. त्याशिवाय जर दुस-यांदा याच कारणामुळे पकडले गेल्यास तुरुंगाची रवानगी करण्यात येईल. हेही वाचा- मुंबईकरांनो सावधान! या '5' नो पार्किंग परिसरात वाहन उभे केल्यास बसणार दंड!
मोदी सरकारच्या या निर्णयामुळे विरोधकांकडून कडाडून टीका होत आहे. यात समाजवादी पक्षाचे राष्ट्री प्रवक्ते आय.पी. सिंह ने असे ट्विट केले आहे की, माझ्या सर्व गरीब बंधू-भगिनींनो सावध व्हा. आता गावातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी आता चप्पल घालून दुचाकी वाहन चालवू शकणार नाही. मोदी सरकारमध्ये आता सूट-बूटात बाइक चालवावी लागेल नाहीतर जोगी बाबांचे पोलीस तुमच्यावर दंड आकारेल.