No parking(फाईल फोटो)

मुंबई (Mumbai) शहरात वाहनांचे अधिक प्रमाण वाढल्यामुळे वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यावर उपाय म्हणून वाहतूक विभागाने त्यांच्या नियमात मोठा बदल केला आहे. मुंबईच्या न्यु लिंक रोड (New Link Road Andheri), एस व्ही रोड (S.V Road) आणि गोखले रोड (Gokhale Road) सह आणखी ५ रस्त्यावर अधिक वाहतूक कोंडी आढळते. माहितीनुसार, काही प्रवासी त्यांचे वाहन नो पार्किंगच्या परिसरात उभे करतात. यामुळे वाहतुक कोंडीसारखे प्रश्न निर्माण होतात, असे सांगितले जात आहे. अशा समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक विभागाने हे पाऊल उचलले आहे. आता नो पार्किंगच्या परिसरात वाहन उभे करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच फटका बसणार आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात मुंबईला येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. वाहतूकीच्या या बदललेल्या नियमांमुळे वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण त्यामुळे नेमकी पार्किंग करायची कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या रस्त्यांवर 14 किलोमीटरचा अंतरापर्यंत नो पार्किंगचा फलक लावण्यात आले आहे. या अंतरावर कोणतेही वाहन पार्किंग केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. एवढेच नव्हे तर, बस थांब्याच्या दोन्ही बाजूस 50 मीटरच्या आत वाहन पार्क करणाऱ्या प्रवाशांवरही कारवाई केली जाणार आहे. हे देखील वाचा- मुंब्रा: ऑन ड्युटी वाहतूक पोलीसांचा मोबाईल चोरी; चौघांना अटक

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यामुळे हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. एकीकडे वाहतूकीचा मुद्दा गंभीर असताना तिकडे बेस्ट कर्मचाऱ्यांचे उपोषण काही संपण्याचे नाव घेत नाही आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावा लागत आहे.