IndiGo विमानामध्ये प्रवाशाने ओढली सिगारेट; प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल
IndiGo Flight | (Photo Credit - ANI/X)

दिल्ली मुंबई IndiGo च्या विमानात एका व्यक्तीने वॉशरूममध्ये सिगारेट ओढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 38 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना बुधवार 26 जूनची आहे. आज (28 जून) यामध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे विमान दिल्ली वरून 5.15 च्या सुमारास मुंबईकडे निघाले होते. तर 176 प्रवासी या विमानात प्रवास करत होते.

विमान मुंबईला येण्यापूर्वी किमान 50 मिनिटं आधी हा प्रवासी विमानाच्या शौचालयात गेला. तेथे तो स्मोक करत असल्याचं समजलं. Khalil Kajammul Khan असं प्रवासीचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.

केब्रिन क्रू ला स्मोक सेंसर मुळे या प्रकाराची माहिती मिळाली. त्यानंतर शौचालयामध्ये सिगारेट आणि मॅच बॉक्स देखील सापडला. खान याला प्रश्न विचारताच त्याने आपण सिगारेट प्यायल्याचं कबुल केले आहे. विमान लॅन्ड झाल्यानंतर घडला प्रकार सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित अधिकार्‍याला कळवण्यात आला. त्यानंतर त्या प्रवाशाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली. Indian Penal Code आणि Aircraft Rules नुसार त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.