विधानसभा निवडणूक निकालाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन
Pm Modi (file photo)

केंद्र सरकारचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session ) आजपासून (मंगळवार, 11 डिसेंबर) सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सभागृहात विविध विषयांव शांतता आणि सौहादपूर्ण चर्चा करण्याचे अवाहन संसद सदस्यांना केले. सभागृहात चर्चा व्हावी, भले वाद होऊ दे, घमासान होऊ दे, पण विविध विषयांवर चर्चात्मक संवाद होऊदेत असे मोदी म्हणाले. गरज पडल्यास निर्धारीत वेळेपेक्षा अधिवेशन कालावधी वाढवू असेही पंतप्रधान मोदी. दरम्यान, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीगढ, तेलंगणा आणि मिझोराम राज्यांतून येत असलेल्या विधानसभा निवडणूक निकालाबाबत येत असलेल्या प्रथमिक अंदाजाबाबत मात्र मोदींनी कोणतेही भाष्य केले नाही.

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीगढ, तेलंगणा आणि मिझोराम राज्यांतून भाजपसाठी धक्कादायक निकाल हाती येत आहेत. मिझोरामचा अपवाद वगळता उर्वरीत चारही राज्यांत काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे या निकालांबाबत पंतप्रधान मोदी काही भाष्य करतील असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंना अपेक्षीत होते. मात्र, प्रतिनिधिंची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. (हेही वाचा, पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची भाजपवर 5-0ने आघाडी, सत्तापरिवर्तनाचे संकेत)

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार, भाजप 103, काँग्रेस 112 तर 15 ठिकाणी इतर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. राजस्थानमध्येही भाजप 81, काँग्रेस 114, 04 ठिकाणी इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. छत्तीसगडमध्ये भाजप 24, काँग्रेस 59 जागांवर तर 7 जगांवर इतर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तेलंगणातही टीआरएस 85 , काँग्रेस 17, बाजप 2 इतर पक्ष 7 जागांवर आघाडीत आहेत. मिझोराममध्ये काँग्रेस 09, एमएनएफ, 27, भाजप 1 इतर उमेदवार 3 ठिकाणी आघाडीवर आहेत.