पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला पाकिस्तानी दहशतवादी संघटनांकडून धोका; दिल्लीच्या रामलीला मैदानावरील रॅली दरम्यान सुरक्षा वाढवण्याचे गुप्तचर यंत्रणेचे आदेश
Narendra Modi (Photo Credits: Twitter)

पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना जीवेमारण्यचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. दरम्यान 22 डिसेंबरच्या दिल्लीतील रामलीला मैदानावर (Ramlila Maidan) आयोजित भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात हा घातपात होऊ शकतो असे सांगण्यात आले आहेत. तसेच या रॅलीला विशेष प्रोटेक्शन ग्रुप आणि दिल्ली पोलिसांची तुकडी देण्यात यावी असं सांगण्यात आलं आहे. Citizenship Amendment Act 2019: सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेली हिंसक निदर्शने दुर्दैवी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चिंताजनक ट्विट.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष सुरक्षा पुरवली जावी यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेच्या माहितीनुसार, जैश ए मोहम्मद सारख्या आतंकावादी संघटनांच्या काही तुकड्या भारतामध्ये पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान रामलीला मैदानावर हजारो लोकांमध्ये नरेंद्र मोदींवर हल्ला होऊ शकतो. या रॅलीमध्ये एनडीए सरकारशी निगाडीत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीदेखील सहभागी होणार आहेत.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेसाठी खास गाईडलाईंस जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान 12 डिसेंबरला लागू करण्यात आलेल्या नागरिकत्त्व कायदा, 9 नोव्हेंबरच्या राम जन्मभूमीवरील निर्णय, 5 ऑगस्ट दिवशी कश्मीरमधून आर्टिकल 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका वाढला आहे. या सार्‍या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका वाढला आहे.