P Gopinathan Passed Away : गांधीवादी नेते पी गोपीनाथन नायर यांचं निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बड्या नेत्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली

भारत स्वातंत्र्यापासून सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे गांधीवादी नेते पी गोपीनाथन (P Gopinathan) यांचं निधन झालं आहे. ते शंभर वर्षांचे होते. वृध्दापकाळामुळे ते बरेच दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिरुवनंतपुरममध्ये (Thiruvananthapuram) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोपीनाथन यांच्या कामाची कारकीर्द फार मोठी आहे. 2016 मध्ये त्यांना पद्मश्रीने (Padma Shri) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. केरळमध्ये सांप्रदायिक काळात शांतता प्रस्थापित करण्यात नायर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोंदीसह (PM Modi) कॉंग्रेसचे नेते शशी थरुर (Shashi Tharoor), केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन (Pinarayi Vijayan), राज्यपाल आरिफ मुहम्मद खानसह अनेक बड्या नेत्यांनी भावपूर्ण पी गोपीनाथन यांना श्रध्दांजली दिली आहे.  स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि गांधीवादी विचारांसाठी पी गोपीनाथन नायर कायम आठवणीत असतील. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना, असं भावनिक ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी पी गोपीनाथन नायर यांना श्रध्दांजली दिली आहे.

गांधीवादी विचार ओळखले जाणारे गोपीनाथन नायर यांचं दक्षिण भारताच्या जडणघडणात मोठं योगदान आहे. भारत छोडो आंदोलनातील सहभागादरम्यान त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. गोपीनाथन यांच्यावर अगदी लहान वयापासूनच गांधीच्या विचारसणीचा प्रभाव होता. लहानपणापासून ते महात्मा गांधींना अनेकदा भेटले होते. गोपीनाथन यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला होता.