Terrorists प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - X/@Anti_Separatist)

Jammu and Kashmir: जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) मध्ये सर्वात कमी दहशतवादी (Terrorists) नोंदवले गेले आहेत, कारण सरकारने दहशतवादी कारवायांसाठी भारतीय भूमीचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीन (एचएम), जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि लष्कर-ए-तोयबा (एलईटी) चे एकूण 59 पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय आहेत. केंद्रशासित प्रदेशात सक्रिय स्थानिक दहशतवाद्यांची संख्या 17 आहे. जम्मू प्रदेशात स्थानिक दहशतवाद्यांची संख्या फक्त 3 असून संपूर्ण खोऱ्यात 14 दहशतवादी असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय परदेशी दहशतवाद्यांची एकूण संख्या 59 आहे, त्यापैकी 3 हिजबुल मुजाहिदीनचे, 21 जैश-ए-मोहम्मदचे आणि 21 लष्कर-ए-तोयबाचे असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच वेळी, जम्मू प्रदेशात सक्रिय स्थानिक दहशतवाद्यांची संख्या 3 असून खोऱ्यात सक्रिय स्थानिक दहशतवाद्यांची संख्या 14 आहे.

दरम्यान, 16 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान मणिपूरमध्ये एकूण 990 शस्त्रे जप्त करण्यात आली. याशिवाय, लष्कराळा याठिकाणी 11,526 राउंड दारूगोळाही सापडला. तसेच 366 हातबॉम्ब, 230 बॉम्ब आणि 10 सुधारित स्फोटके (आयईडी) जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.