गोवा (Goa) राज्यातील काँग्रेस (Congress MLA) पक्षाचे आमदार अतानासियो मोनसेराते (Atanasio Monserrate) यांच्यावर अल्पवयीन मुलीची खरेदी करून बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मोनसेराते यांनी 50 लाखाला एका अल्पवयीन मुलीला विकत घेतले आणि नंतर तिला ड्रग्स देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप स्वतः पीडित मुलीने केला होता. 2016 मध्ये या मुलीने केलेल्या तक्रारीनुसार आता मोनसेराते यांची कसून चौकशी होणार असल्याचे समजत आहे. पीडित मुलीच्या जबाबाप्रमाणे तिच्यावर बलात्कार करण्याआधी मोनसेराते हे तिला ड्रग्स देत असल्याचे देखील सांगितले जातेय.
या आधी अतानासियो मोनसेराते यांनी आरोप नाकारून हा खटला रद्द करण्याची मागणी केली असता गोव्यातील एका कोर्टाने त्यांची मागणीच फेटाळून लावली होती. यांनंतर त्यांना आठ दिवस तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती, आणि आता कोर्टाच्या आदेशानुसार १२ जून ला मोनसेराते यांच्यावरच्या आरोपांची तपासणी होऊन सुनावणी करण्यात येणार आहे.२०१६ साली मोनसेराते यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाची गणना ही POSCO ऍक्टचे उल्लंघन केल्याच्या अंतर्गत होत आहे. त्यासाठी त्यांना आता कोर्टाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. बारामती: विद्यार्थ्याकडून अल्पवयीन मुलीवर टॉयलेटमध्ये बलात्कार, नामांकित शाळेतील घटना
एप्रिल २०१९ मध्ये मोनसेराते यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. हे प्रकरण सुरु झाल्यापासूनच ते हा आरोप खोटा असल्याचे सांगत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला टार्गेट करण्यासाठी गोवा सरकारचा कट असल्याचे देखील त्यांनी याआधी म्हंटले होते.