बारामती: विद्यार्थ्याकडून अल्पवयीन मुलीवर टॉयलेटमध्ये बलात्कार, नामांकित शाळेतील घटना

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काही महिन्यांपूर्वीच घडली आहे. मात्र, पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला वाचा फूटली आहे. आरोपी आणि पीडिता यांच्यात तोंडओळ आहे. ते इयत्ता नववी किंव दहावीत शिकत असावेत असा अंदाज फिर्यादीत नोंदवला आहे.

बारामती: विद्यार्थ्याकडून अल्पवयीन मुलीवर टॉयलेटमध्ये बलात्कार, नामांकित शाळेतील घटना
Rape | (File Photo)

वर्गातील विद्यार्थ्याकडून शाळेतीलच 13 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार (Rape)झाल्याची धक्कादाय घटना बारामती (Baramati) येथे घडली आहे. बारामती येथील नामांकित विद्यालयाच्या टॉयलेटमध्ये हा प्रकार घडला. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर शहर पोलीसांनी शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बलात्कार आणि लैंगिक शोषण असे आरोप आरोपींवर ठेवण्यात आले आहेत. तसेच, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काही महिन्यांपूर्वीच घडली आहे. मात्र, पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला वाचा फूटली आहे. आरोपी आणि पीडिता यांच्यात तोंडओळ आहे. ते इयत्ता नववी किंव दहावीत शिकत असावेत असा अंदाज फिर्यादीत नोंदवला आहे. (हेही वाचा, नागपूर: अल्पवयीन मुलीसह एका महिलेवर बलात्कार; एका आरोपीस अटक, दुसरा फरार)

तसेच, फिर्यादीत केलेल्या उल्लेखाच्या हवाल्यने प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, उंचीने कमी आणि उंचीने अधिक असलेल्या आरोपींनी हे कृत्य केले. यातील कमी उंचीच्या मुलाने पीडितेवर बलात्कार केला. तर, उंचीने अधिक असलेल्या मुलाने कमी उंचीच्या मुलाला बलात्कार करण्यासाठी मदत केली. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

(The above story first appeared on LatestLY on May 03, 2019 11:24 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).