जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) मधील पुलवामा (Pulwama) भागात दहशतवाद्यांच्या उचापती सुरुच आहे. मात्र त्यांच्यासमोर ढाल बनून उभे असलेले भारतीय सैन्य देखील त्यांना तोडीस तोड उत्तर देत आहेत. पुलवामा भागात सुरु असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला (Terrorist) कंठस्नान घालण्यास भारतीय सैन्याला यश आले असून एका जवानाला वीरमरण आले आहे. दहशतवाद्यांचा सर्व प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी भारतीय सैन्य (Indian Army) पूर्ण शक्ती एकवटून प्रयत्न करत आहेत. पुलवामा जिल्ह्यात कामराजीपोरामध्ये सफरचंदाच्या बागेमध्ये आज सकाळी 2 अतिरेकी असल्याची बातमी मिळाल्यानंतर भारतीय सैन्याने या परिसराला चारही बाजूंनी घेरले. यामध्ये खूप वेळ चकमक सुरु होती.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात दहशतवाद्यासोबत झालेल्या चकमकीत एका भारतीय जवानाला वीरमरण आले असून एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. या दहशतवाद्याकडून एके, दारूगोळा आणि अन्य शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली आहे. ही चकमक अजून सुरु असल्याचे भारतीय सैन्याकडून माहिती मिळत आहे. त्याचबरोबर शोध मोहिमही सुरु आहे. जम्मू आणि काश्मीर: 24 तासांत सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यातील दुसरी मोठी चकमक; शोपियां मध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा
#UPDATE One soldier lost his life in action in the ongoing Pulwama encounter. One AK along with grenades, pouches & other war like stores recovered. Search operation underway: Chinar Corps, Indian Army https://t.co/z6EvoAH6JX
— ANI (@ANI) August 12, 2020
मागील महिन्यात जम्मू-काश्मिरच्या शोपियामध्ये भारतीय सैन्याची दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 3 दहशतावाद्यांचा खात्मा केला होता. काश्मीर पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षारक्षकांनी टॉप कमांडरांच्या ग्रुपची एक यादी तयार केली आहे. त्यांना पुढील काही दिवसांत ट्रॅक करण्यात येईल. दरम्यान जूनमध्ये दक्षिण काश्मीरच्या चार जिल्ह्यातील 48 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.