यंदा भारत सरकारने Pakistan National Day च्या कार्यक्रमावर भारतीय प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय काही वेळापूर्वी जाहीर केला. त्यानंतर दिल्लीतील पाकिस्तान हाय कमिशन (High Commission of Pakistan) बाहेर एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही व्यक्ती हुर्रियत कार्यकर्ता असल्याचं टाईम्स नॉऊच्या रिपोर्टमध्ये लिहण्यात आले आहे. जम्मू काश्मिरमधून अनेक फूटीरतावादी नेत्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. यानंतर भारताने अधिकृत अधिकारी न पाठवण्यचा निर्णय घेतला आहे.
ANI ट्विट
Spot visuals: One person has been detained from outside the High Commission of Pakistan in New Delhi, where Pakistan National Day is to be celebrated today. pic.twitter.com/BGgLqBrYiJ
— ANI (@ANI) March 22, 2019
Lahore Resolution च्या स्मरणार्थ दरवर्षी 23 मार्च दिवशी पाकिस्तान डे साजरा केला जातो. यानिमित्त यंदा दिल्लीतील पाकिस्तान हाय कमिशनमध्ये खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मागील वर्षी गजेंद्र सिंग शेखावत यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र यंदा पुलवामा हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तानचे संबंध तणावग्रस्त झाले आहेत. परिणामी भारत सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.