'One Nation One Ration Card' या पथदर्शी प्रकल्पाला सुरुवात, लवकरच देशातील नागरिकांना घेता येणार लाभ
राम विलास पासवान (फोटो सौजन्य-Twitter)

सरकारने 'वन नेशन वन रेशन कार्ड' (One Nation One Card)  या पथदर्शी प्रकल्पाला (Pilot Project)  सुरुवात केली आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्रात कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधेच्या केंद्राचे उद्घाटन सार्वजनिक पुरवठा मंत्री राम विलास पासवान (Ram Vilas Paswan) यांनी शुक्रवारी केले आहे. हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यास तो संपूर्ण देशात लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या योजनेअंतर्गत रेशन कार्ड संपूर्ण देशात मान्य होणार आहे.

या योजनेमुळे राशनकार्डासह राशनबद्दल होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच गरिबांना दिल्या जाणाऱ्या सब्ससिडीपासून वंचित रहावे लागणार नाही आहे. तसेच एकापेक्षा अधिक रेशन कार्ड एका परिवाराकडे असणे अमान्य होणार आहे.

तसेच डुब्लीकेट राशन कार्डावर आळा घालण्यासाठी सरकार सर्व रेशन कार्ड धारकांची यादी बनवणार आहे. त्यानुसार खोटे रेशन कार्ड आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल. त्याचसोबत नागरिकांना अन्नधान्याच्या बाबत संपू्र्ण सुरक्षिततचा बाळगण्यात येणार आहे.