India-Nepal Border Firing:  भारत - नेपाळ सीमेवर सीतामढी भागात गोळीबार; 1 ठार 2 जण जखमी
India-Nepal | Photo Credits: Twitter/ ANI

आज भारत - नेपाळ सीमेवर झालेल्या गोळीबारामध्ये 1 जण ठार झाला असून 2 जण मृत्यूमुखी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान बिहारमधील सीतामढी (Sitamarhi)या गावात नेपाळकडून गोळीबार करण्यात आला असा स्थानिकांचा दावा आहे. दरम्यान ANI च्या ट्वीटनुसार, बिहार सेक्टरच्या सशस्त्र सीमा बळ आय जी कडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

दरम्यान जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान ही घटना सीतामढीच्या जानकीनगर गावातील आहे.

सध्या मागील काही दिवसांपासून भारत-नेपाळ सीमेवरून वाद सुरू आहे. त्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे.

ANI Tweet  

दरम्यान नेपाळच्या नवीन नकाशामध्ये लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कलापाणी यासोबतच गुंजी, नाभी आणि काटी या गावांचा समावेश करण्ययत आला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळात नव्या नकाशाला मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि नेपाळच्या सीमारेषेवरून आता तणावाचं चित्र निर्माण झालं आहे.