One Child Policy च्या कायद्यासाठी रामदास आठवले यांचा आरपीआय पक्ष मांडणार प्रस्ताव
केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Photo Credit: ANI)

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale)  यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) ने शनिवारी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार 'वन फॅमिली वन चाइल्ड' (One Family, One Child) कायदा लागू करण्यासाठी लवकरच या बद्दलचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षाने असे म्हटले की, देशातील वाढत्या लोकसंख्येवर लगाम घालण्यासाठी परिवारात एकच मुल असण्याची योजना असावी.

आठवले यांनी अहमदाबाद मध्ये मीडिया सोबत बातचीत करताना म्हटले की, वाढती लोकसंख्या आपल्या देशासाठी एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे जर आपल्याला आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर लोकसंख्या कमी करावी लागेल. आधी कुटुंब नियोजनासाठी आम्ही दोघे, आमचे दोन असा नारा दिला जात होता. मात्र आमच्या पार्टीचा विचार आहे की, आम्ही दोघे, आमचा एक असे असावे. केंद्रीय मंत्र्यांनी पुढे असे म्हटले की, हा कायदा लागू करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या समोर प्रस्ताव मांडणार आहोत. आम्ही असा कायदा घेऊन येण्याचा प्रयत्न करु आणि अपेक्षा ही करतो अशाच प्रकारचा कायदा लागू होईल. आठवले यांनी संविधानात बदल करण्याच्या शंका सुद्धा दूर केल्या आहेत.(PM Modi Birthday: पीएम नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त BJP कडून सेवा आणि समर्पण अभियान चालवले जाणार)

Tweet:

त्यांनी असे म्हटले की, कोणकडे ही असे करण्याची शक्ती नाही आहे. काही लोकांद्वारे अफवा पसरवली जात आहे. असे म्हणतात की, भाजप संविधान बदलेल, मोदी संविधान बदलतील. मात्र मोदी हे बाबा साहेबांच्या संविधानाचे समर्थन करतात. त्यामुळे त्यांच्याकडून यामध्ये बदल करण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही. जर मोदी जी हे संसदेत मान खाली घालतात याचा अर्त असा होतो की, ते संविधानाचा सन्मान करता. संविधान बदलण्याची ताकद कोणाकडेच नाही आहे.

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी हिंदू अल्पसंख्यांकांवरुन केलेल्या विधानावरुन आठवले यांना विचारले. तेव्हा आठवले यांनी असे म्हटले की, गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांचे आपले स्वत:चे विचार असू शकतात. माझे असे मानणे आहे की, हिंदू अल्पसंख्यांक असण्याबद्दल कोणातच प्रश्न नाही. हिंदू किंवा मुस्लिम यांची लोकसंख्या जशीच्या तशीच राहणार आहे. गेल्या काही वर्षात देशात मुस्लिम जनसंख्या अचानक वाढली आहे.