PM Narendra Modi (Photo Credits: Twitter/@NarendraModi)

आज National Technology Day 2020 चं औचित्य साधत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना शुभेच्छा देत तंत्रज्ञान क्षेत्रात कामगिरी करणार्‍यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान ट्वीटरच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील संशोधकांच्या कामागिरीमुळे सामान्यांच्या आयुष्यात झालेल्या लहान मोठ्या पण सकारात्मक बदलांबाबत धन्यवाद मानले आहेत. दरम्यान जगभरात कोरोना व्हायरसचं जागतिक संकट घोंघावत असताना त्यावर मात करण्यासाठी आज टेक्नॉलॉजीची मोठी मदत मिळत आहे. निरोगी आयुष्य आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला जितका जास्त तंत्रज्ञानाचा वापर करता येईल त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असेही त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून म्हटले आहे. 1998 साली भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरीचा भारताच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान आहे. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांच्या पाठीवरही आज मोदींनी कौतुकाची थाप दिली आहे.

नरेंद्र मोदी याचं ट्वीट

दरवर्षी 11 मे ला नॅशनल टेक्नॉलॉजी डे साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीचा, संशोधक, तंत्रज्ञांच्या कार्याला या दिवशी धन्यवाद म्हटलं जातं. दरम्यान हा दिवस भारताच्या पोखरण अणूचाचणी दिवसाची वर्षपूर्ती म्हणून देखील साजरा केला जातो. भारताने 1998 साली माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नेतृत्त्वाखाली अणुचाचणी ऑपरेशन शक्ती म्हणून केली होती. दरम्यान त्यानंतर ते DRDO चे संचालक म्हणून नेमण्यात आले.