आज संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिवसाचे औचित्य साधून, विरोधी पक्ष कॉंग्रेसने (Congress) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना एक खास गोष्ट भेट म्हणून पाठवली आहे. देशाच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, कॉंग्रेसने आपल्या घटनेची (Constitution) एक प्रत रविवारी पंतप्रधानांना पाठविली. सोबत, 'जेव्हा आपल्याला देशाचे विभाजन करण्यापासून वेळ मिळेल, तेव्हा ही कृपया वाचा' असा टोमणाही मारला आहे. भाजपने CAA-NPR-NRC बद्दल जी भूमिका घेतली आहे, त्यासंदर्भात ही भेट कॉंग्रेसने पाठवली आहे.
Dear PM,
The Constitution is reaching you soon. When you get time off from dividing the country, please do read it.
Regards,
Congress. pic.twitter.com/zSh957wHSj
— Congress (@INCIndia) January 26, 2020
ही पोस्ट कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केली गेली आहे. या पोस्टमध्ये एक फोटो जोडला गेला आहे. हा फोटो अॅमेझॉनच्या स्क्रीनशॉटचा आहे. त्यानुसार 170 रुपयांच्या घटनेची प्रत कॉंग्रेसने पाठवली आहे. पेमेंट मोड- कॅश ऑन डिलिव्हरी आहे, म्हणजे ज्याला ही ऑर्डर मिळेल त्याला पैसे द्यावे लागतील. ही प्रत 'केंद्रीय सचिवालय दिल्ली' या पत्त्यावर पाठवली गेली आहे. केंद्रीय सचिवालयात संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधानांचे कार्यालय आहे.
(हेही वाचा: जम्मू-काश्मीरला केंद्र सरकारची मोठी भेट; विकास कामांसाठी 80 हजार कोटींचे पॅकेज जाहीर)
घटनेच्या कलम 14 अन्वये कायद्यानुसार सर्व धर्मिय, जाती किंवा लिंग असणाऱ्या व्यक्ती समान आहेत. मात्र हे समजण्यास भाजप अपयशी ठरला. हीच गोष्ट कॉंग्रेसला आपला विरोधी पक्ष भाजपला समजावून द्यायची आहे. सीएए-एनपीआर-एनआरसीबाबतीत देशातील बर्याच ठिकाणी निदर्शने होत आहेत. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीएएबद्दचा निर्णय मागे घेतला जाणार नाही, असे सांगितले आहे. परंतु अनेक कॉंग्रेस शासित राज्यांनी विधानसभेत सीएएविरोधात ठराव पास केला आहे.