महाराष्ट्रामध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत ही वाढ 17.7% आहे. यामध्ये आता पुण्यात ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट BQ.1, BA.2.3.20 देखील आढळला आहे. हा BA.2.75 आणि BJ.1 यांचे रिकॉम्बिनंट आहे. नव्या व्हेरिएंटचा देशातील पहिला रूग्ण पुणे शहरात आढळला असल्याने आता प्रशसन देखील अलर्ट मोड वर आलं आहे. दिवाळी सारखा सण आणि आगामी थंडीचा ऋतू पाहता दक्षता घेणं थोडं अधिक गरजेचे असल्याचं Maharashtra surveillance officer Dr Pradeep Awate यांनी म्हटलं आहे.
अवटे यांनी इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये जिनोम सिक्वेन्सिंग द्वारा समोर आलेल्या बाबीमध्ये BA.2.75 चा संसर्ग आता 95% वरून 76% झाला आहे. पण आता महाराष्ट्रात XBB,हा नवा व्हेरिएंट देखील आला आहे. तसेच पहिल्यांदाच BA.2.3.20 आणि BQ.1 व्हेरिएंट देखील आला असल्याचं त्यांनी नमूद केले आहे. Omicron – XBB हा BA.2.75 आणि BJ.1 चं कॉम्बिनेशन आहे. ऑक्टोबर महिन्यातील जिनोम सिक्वेंसिंग पाहता पुण्यात XBB चे 63 रूग्ण आहेत. मात्र हा क्लिनिकली धोकादायक आहे का? याची माहिती संशोधकांनी या आठवड्यात केलेल्या अभ्यासानंतरच समोर येऊ शकते.
डॉ. अवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, BA.2.3.20 आणि BQ.1 हे ओमिक्रोन व्हेरिएंट पहिल्यांदाच भारतामध्ये आढळले आहेत. तज्ञांच्या मतानुसार, दोन्ही व्हेरिएंट्स हे म्युटेशन आहेत ज्यामुळे ते अत्यंत संसर्गजन्य आहेत आणि संक्रमित लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करू शकतात. BQ.1 आणि B.Q.1.1 हे BA.5 चे सब व्हेरिएंट्स आहेत, जे सध्या अमेरिकेमध्ये 60% कोविड रूग्णसंख्यांमध्ये दिसून येत आहेत. हे देखील नक्की वाचा: New COVID-19 Variants: ओमिक्रॉनचे अधिक धोकादायक उप-प्रकार, BF.7 आणि BA.5.1.7, चीनमध्ये आढळले, लोकांमध्ये घबराट.
The Lancet Infectious Diseases journal मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ओमिक्रॉनचा BA.2.75.2 प्रकार रक्तातील न्युट्रिलायझिंग अॅन्टिबॉडीज मोठ्या प्रमाणात टाळतो आणि अनेक COVID-19 अँटीबॉडी उपचारांना प्रतिरोधक आहे.