Ola Prime Plus: आता कॅब ड्रायव्हर रद्द करणार नाही तुमची राइड; ओलाने लॉन्च केली 'प्राइम प्लस' सेवा, जाणून घ्या सविस्तर
OLA (credit- PTI)

कॅब ड्रायव्हरने शेवटच्या क्षणी राइड रद्द केल्याचा प्रकार आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत कधी ना कधी घडला असेल. या समस्येमुळे कधी कधी अनेकांसाठी कॅब शोधणे ही मोठी समस्या ठरते. विशेषतः सर्वसामान्य कार्यलयीन वेळेत किंवा पावसाळ्यात या समस्येला तोंड द्यावे लागते. मात्र आता आपल्या ग्राहकांच्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी, ओला कंपनी (Ola Cabs) त्यांच्या ‘ओला प्राइम प्लस’ (Ola Prime Plus Service) नावाच्या नवीन प्रीमियम सेवेची चाचणी करत आहे.

जेव्हा एखादा वापरकर्ता प्राइम प्लसद्वारे कॅब बुक करेल तेव्हा त्याला 'सर्वोत्कृष्ट ड्रायव्हर्स, नो कॅन्सलेशन किंवा ऑपरेशनल अडथळे' सह राइड मिळू शकेल. प्राइम प्लस सेवा सध्या फक्त बेंगळुरूमधील काही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. ही नवीन सेवा सर्व वापरकर्त्यांसाठी रोल आउट करण्यापूर्वी कंपनी या सेवेला बेंगळुरूमध्ये मिळणारा प्रतिसादही पाहत आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी स्वत: ट्विटद्वारे ही माहिती दिली.

भाविशने ट्विट केले की, तो स्वत: ही नवीन सेवा सतत वापरणार आहे आणि त्याचे अनुभव ट्विटरवर शेअर करणार आहे. भाविशने या सेवेच्या किंमतीबद्दलही माहिती दिली आहे. प्राइम प्लसच्या माध्यमातून राइड कॅब बुक केल्यास 455 रुपये खर्च येईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, मिनी कॅब बुक केल्यावर याच राइडची किंमत 535 रुपये आहे. साधारणपणे, ओला कॅबद्वारे राइड बुक करताना मिनी हा सर्वात स्वस्त पर्याय मानला जातो. (हेही वाचा: दिल्लीमध्ये पेट्रोल पंप वर 2000 ची नोट घेण्यास नकार दिलेल्या कर्मचार्‍याला पोलिसांनी केली अटक)

दरम्यान, या वर्षी फेब्रुवारीमध्ये अग्रवाल यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ला खूप प्रोत्साहन दिले होते. भारताने या क्षेत्रात आघाडी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले होते. अशा तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे नोकऱ्या जाणार असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. ते याकडे उत्पादकता वाढवताना पाहतात. एआय 10 पटीने उत्पादकता वाढवू शकते यावर त्यांनी भर दिला.