IRCTC मधील 20% भागीदारी OFS द्वारा विक्रीसाठी उपलब्ध;  प्रति शेअर  Floor Price 1,367 रूपये
IRCTC | (Photo Credits: Wikipedia)

IRCTC कडून आज OFS अंतर्गत 20% भागीदारी विकण्याची घोषणा झाल्यानंतर शेअर्स एका दिवसांत 13 % कोसळले आहेत. ऑफर फॉर सेल अंतर्गत आता सब्सक्रिप्शन आज (10 डिसेंबर) पासून खुले करण्यात आले आहेत. आज दुपारी 12 वाजता आयआरसीटीसीचा स्टॉक 8% नी खाली म्हणजे अंदाजे 1485 रूपयांवर ट्रेड होत होता.

IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, प्रति शेअर त्यांनी आधारमूल्य 1367 रूपये ठरवले आहे. आज गुरूवार पासून ते विक्रीसाठी खुले असतील. सरकार 15% डीइन्व्हेस्ट करणार असून 5% ग्रीन शू चा देखील पर्याय उपलब्ध असेल. याबाबत डीआईपीएएम सचिव तुहीन कांता पांडे यांनी एक ट्वीट केले आहे.

आयआरसीटीसी ने एक रेग्युलेटरी फायलिंग मध्ये दिलेल्या माहितीनुसार, सरकार कंपनीचे 2,40,00,000 इक्विटी शेअर विकण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. हा अंदाजे 15% भागीदारी इतका असेल. सोबतच 80,00,000अतिरिक्त शेअर विकण्याचा देखील विकल्प आहे. जो एकूण इक्विटी शेअर कॅपिटल च्या 5% भागीदारी इतका असेल. खुशखबर! आता कन्फर्म रेल्वे तिकिटांवर तुम्ही बदलू शकता प्रवाशाचे नाव, IRCTC ने दिलेल्या या सुविधेचा कसा कराल वापर.

यंदा कोविड 19 मुळे भारत सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार आला आहे. यामध्ये सध्याच्या आर्थिक वर्षात Disinvestment च्या माध्यमातून सरकार 2.10 लाख कोटी उभारण्याचा विचार करत आहे.