![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/08-1-784x441-380x214.jpg)
बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म असं म्हटलं जातं. मध्यप्रदेशात नॉर्मल डिलेव्हरीसाठी गेलेल्या एका महिलेसोबत झालेला प्रकार धक्कादायक प्रकार वाचून तुम्हांलाही ही गोष्ट पटेल. मध्यप्रदेशच्या ईसागढ भागातमध्ये सरकारी दवाखान्यात नॉर्मल प्रसुतीसाठी गेलेल्या एका महिलेला प्रसुतीसाठी मदत करताना नर्सने तिच्या पोटावर इतक्या प्रचंड प्रमाणात दाब दिला की त्या महिलेचं आतडं आणि गर्भाशयदेखील बाहेर आलं. नर्सच्या हलगर्जीपणाचा कळस म्हणजे तिने महिलेल्या मांसाचा तुकडा एका कागद्याच्या तुकड्यात गुंडाळून देऊन दुसरीकडे उपचारासाठी जा अन्यथा जीवाला धोका आहे असे सांगितलं. उपचारादरम्यान परवड झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला.
ईसागढच्या स्वास्थ्य केंद्रावर या महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी सुमारे दीड तास चक्काजाम आंदोलन केले. 25 जानेवारीच्या दिवशी दुपारी 12 च्या सुमारास पिंकी या गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी ईसागढच्या आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आलं. त्यावेळेस नर्सने चूकीच्या पद्धतीने दाब दिल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. पिंकीच्या कुटुंबीयांनी ईसागढनंतर भोपाळच्या अशोकनगर परिसरात पिंकीला एका रूग्णालयामध्ये दाखल केले. त्यावेळेस तिला 3 बाटल्या रक्त चढवण्यात आलं मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. पिंकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नक्की वाचा: गुजरात: मद्यधुंद अवस्थेत डॉक्टरांनी केली प्रसुती, आई-बाळाचा मृत्यू
प्रसुतीदरम्यान गर्भाशय किंवा इतर अवयव बाहेर पडणं ही अगदीच विरळ घटना आहे. मात्र अप्रशिक्षित नर्सच्या किंवा प्रसुती करणार्या व्यक्तीमुळे हे होऊ शकते. भारतामध्ये महिलांमधील मातृ कुपोषण हेदेखील अशा घटनांचं एक कारण आहे. या प्रकारानंतर चीफ मेडिकल हेल्थ ऑफिसरने बीएमओ आणि नर्सची हाकालपट्टी केली आहे.